ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल

शहर : मुंबई

असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल.हे नियम प्रत्येक व्यक्तीने फॉलो करावेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे हे नियम आहेत. आजपासूनच तुम्ही हे नियम फॉलो करण्यास सुरुवात केल्यास फायदा होऊ शकतो.

पहिला नियम

सकाळी उठताच पाणी पिण्याची सवय लावावी. तुम्हाला बद्धकोष्ठता, सांधेदुखी, वाढते वजन समस्या असल्यास सकाळी गरम पाणी प्यावे. या समस्या नसतील तरीही सकाळी गरम पाणी पिल्याने फायदा होऊ शकतो. पाणी कधीही उभे राहून पिऊ नये. नेहमी बसूनच पाणी प्यावे. पाणी हळू-हळू प्यावे, पटकन एकाच वेळी पाणी पिऊ नये. पाणी पिल्यानंतर 20 मिनिट प्राणायाम अवश्य करावा.

दुसरा नियम

पाणी पिल्यानंतर चहा पिणे सोडून द्यावे. याऐवजी सकाळी आवळा-कोरफड ज्यूस किंवा गोमूत्र अर्क पिणे सुरु करावे. यामुळे तुम्हाला थोड्या दिवसातच शरीरात झालेले बदल दिसतील. सकाळी तुळस, लिंबाची पाने चावावीत.

तिसरा नियम

ब्रेकफास्टमध्ये एकसारखे पदार्थ रोज घेऊ नये. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करावा. कधीकधी इडली-सांबर खावे. अंकुरित ध्यान खावे. सलाद अवश्य असावा. महिन्यातील एकदा किंवा दोनदा पराठा नाश्त्यामध्ये घेऊ शकता. आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवावा.

चौथा नियम

स्वयंपाक वेगवेगळ्या तेलामध्ये करावा. कधी सोयाबीन तर कधी मोहरीच्या तेलामध्ये तयार केलेल्या भाज्या खाव्यात. शरीराला सर्वप्रकाराच्या तेलाची आवश्यकता असते. अशाचप्रकारे पोळीसाठीसुद्धा गव्हासोबतच मका, बाजरी, ज्वारी भाकरी करावी. मिक्स धान्याची पोळीही करावी. अन्न चावून-चावून खावे.

पाचवा नियम

रात्री दही खाऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी 4 तास अगोदर जेवण करावे आणि जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.

मागे

केसांच्या आरोग्यासाठी कापूर
केसांच्या आरोग्यासाठी कापूर

सध्या सणावाराच्या निमित्ताने घरोघरी आरत्या सुरू असतात. आरतीच्या वेळी कापू....

अधिक वाचा

पुढे  

बटाट्याचा रस पिण्याचे  फायदे
बटाट्याचा रस पिण्याचे फायदे

उकळलेले किंवा कच्चे बटाटे आपण अनेक चटपटीत पदार्थ बनविण्यात वापरले असतील पण....

Read more