By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लिव्हर अर्थात यकृत आपल्या शरिराराचा अत्यंत महत्त्वाचा भाग, आपलं यकृत तंदुरुस्त असल की आपणही तंदुरुस्त असतो. आपल्या यकृताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाच पदार्थ सांगणार आहोत.
ओट्स -: अनेक संशोधनात ओट्सचे सेवन करणे यकृतासाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रोज ओट्सचे सेवन करावे.
ब्रोकली -: ब्रोकली आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या रोजच्या आहारात तुम्ही ब्रोकलीला उकडून सलादच्या स्वरुपात खाऊ शकता. यकृतासाठी हे फायदेशीर ठरते.
कॉफी -: नियमीत कॉफी प्यायला तुम्हाला भलेही आवडत नसेल. मात्र आपल्या यकृतासाठी कॉफी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच कॉफी घेतल्याने अनेकदा तुमचा कॅन्सरपासून देखील बचाव होतो.
ग्रीन टी -: ग्रीन टी देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. ग्रीन टीमुळे यकृतासंबंधीच्या आजारापासून स्वत:चा बचाव करणे सोपे आहे.
पाणी -: शरिर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, पाणी आहे. तुम्ही दिवसभर भरपूर पाणी पिल्यास अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. त्यामुळे रोज जास्तीत जास्त पाणी प्या आणि निरोगी राहा.
शरीराला आजारपणापासून वाचवण्यासाठी पोषक तत्त्वांनी युक्त भोपळा आणि सूर्यफ....
अधिक वाचा