By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हिवाळ्यात जे लोक अद्रकाचा चहा पितात, त्यांनी या ऋुतूमध्ये ही सवय बदलावयास पाहिजे. कारण आरोग्यासाठी हे नुकसानदायी होऊ शकते.
1. पोटात दुखणे
अद्रक जर पुरेशा प्रमाणात घेतले तर आरोग्यासाठी फायदेशीर होऊ शकते. परंतु वाजवीपेक्षा जास्त घेतल्यास अपचनाचे कारणही होऊ शकते. यामुळे पोटात दुखणे, मुरडणे यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात.
3. झोप येत नाही
रात्री अद्रकाचा चहा घेणे टाळावे. यामुळे तुमची झोपही उडू शकते. अद्रकाचा चहा जास्त प्यायल्यास शरीरात पित्त वाढते. ज्यामुळे मूत्राशयासंबंधीच्या समस्या होऊ शकते.
2. मधुमेह
अद्रकाचे सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी अद्रकाचा चहा पिणे टाळावे. रक्तदाब कमी झाल्यास अद्रकाचा चहा पिणे नुकसानकारक होऊ शकते.
4. गरोदरपणात
गराेदर महिलांसाठी अर्धा कपापेक्षा जास्त चहा पिणे हानीकारक होऊ शकते. अद्रकाच्या जास्त सेवानाने गरोदर महिलांना अपचनासंबंधी समस्या होऊ शकतात.
थोडेसे कष्टाचे काम करताच दम लागतो? पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो? वजनदा....
अधिक वाचा