By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू शरीरातील नसा आणि धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि रक्तप्रवाहाला प्रभावित करून हृद्य रोगामध्ये वृद्धी करते. जर तुमच्या रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही काही भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. या भाज्या बॅड कोलेस्ट्रॉल ने केवळ नियंत्रित करतील तर गुड कोलेस्ट्रॉल तयार करण्यासही मदत करतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या भाज्यांविषयी....
लसूण
सकाळी झोपेतून उठल्यानंतर 3-4 लसणाच्या पाकळ्या चावून-चावून खा. लसूण कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी एखाद्या रामबाण औषधीपेक्षा कमी नाही. कच्चा लसूण खाणे शक्य नसल्यास लसणाची चटणी तयार करून तुम्ही दररोजच्या जेवणासोबत खाऊ शकता.
अद्रक
अद्रक कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात खूप उपयोगी ठरते. अनेक शोधांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, केवळ 3 ग्रॅम अद्रकाचे नियमित सेवन रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल तयार करते.
पुदिना
पुदिन्याचे सेवन बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यात खूप सहायक ठरते. दररोज 5 ते 10 मिली पुदिन्याचा रस कोलेस्ट्रॉलसाठी रामबाण आहे.
कांदा
दररोज तुम्ही तुमच्या आहारात अर्धा कांदा समाविष्ट केल्यास हा तुमच्या शरीरात वाढलेल्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करेल.
भोपळा
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास भोपळ्याचा रस घ्यावा, यामध्ये पुदिना आणि तुळशीची चार-पाच पाने टाकावीत. हे मिश्रण केवळ तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणार नाही तर यामुळे तुमच्या हृदयाच्या धमन्यात जमा झालेला क्लॉटही साफ होईल आणि हृदयाला बळ मिळेल.
मशरूम
मशरूम एक चमत्कारिक भाजी असून नियमित आहारात याचा समावेश केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
पत्ताकोबी
पत्ताकोबी एक अशी भाजी आहे, जी आपल्या गुणांमुळे देशातच नाही तर विदेशातही खूप चर्चेचा विषय ठरली आहे. पत्ताकोबीच्या जेवढ्या प्रजाती आढळून येतात त्या सर्वांमध्ये कितीही गंभीर आजार दूर करण्याची शक्ती आहे. पत्ताकोबीचा रस कॅन्सर, हृद्य रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस इ. गंभीर आजारांवर रामबाण उपाय आहे.
बरेचदा UTI इन्फेक्शन मुळे किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. यापासून बचाव करण्य....
अधिक वाचा