ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरीरातील विषद्रव्ये दूर करण्यासाठी उपयुक्त आहे काकडी, कोथिंबिरीचा रस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरीरातील विषद्रव्ये दूर करण्यासाठी उपयुक्त आहे काकडी, कोथिंबिरीचा रस

शहर : मुंबई

तेलकट, तुपकट पदार्थांचा आनंद अवश्य घ्या, परंतु त्यानंतर शरीराला डिटॉक्सिफायदेखील करा. घरातील काही गोष्टींमुळे शरीरातील टॉक्सिन्स दूर करण्यास मदत होऊ शकते.

1. काकडी

यात जवळपास ९६% पाणी आिण फायबर्स असतात. काकडीला इलेक्ट्रोलाइट्सचे पॉवरहाउसदेखील म्हणतात. हे शरीरातील हानिकारक रसायन आिण अॅसिडयुक्त पदार्थांना बाहेर काढून पचनक्रियेला सुरळीत करण्यात मदत करते.

असे करा

काकडीचे साल काढून ितचे तुकडे करा. मग मिक्सरच्या भांड्यात काकडी, लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, थोडे अद्रक, काळे मीठ अाणि साधे मीठ एकत्र करून मिक्सरमध्ून काढा. याला गाळून घ्या. पाहिजे असल्यास बर्फ मिळवा आणि प्या.

2. कोथिंबीर

कोथिंबीर शरीर स्वच्छ करणाऱ्या एंझाइम्सला वाढवते, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर निघतात. यात अँटिसेप्टिक आिण अँटी फंगल गुणांचे प्रमाण जास्त आहे. याचा रस दररोज प्यायल्यास वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

असे करा

एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून घ्या. यात कापलेली कोथिंबीर, काळे मीठ आिण वाटलेले जिरे मिसळा. यात बर्फही टाकू शकता. मिक्सरमधून बारीक करून घ्या आिण गाळून प्या.

3. लिंबू

यात व्हिटॅमिन सी आिण अँटिऑक्सिडंट‌‌्स आहे. हा शरीरातील जमलेल्या चरबीला कमी करतो आणि शरीराच्या चरबीचे ऊर्जेत रूपांतर करतो. प्रदूषणामुळे शरीराला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यास लिंबाचा रस मदत करतो.

असे करा

एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून घ्या. यात पुदिना आिण मीठ एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्या आिण गाळून प्या. चवीप्रमाणे यात मध घालूनही पिऊ शकता.

4. दालचिनी

दालचिनीमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स आिण हळदीमध्ये असणारे करक्युमिन शरीराला डिटॉक्स करण्याशिवाय वजन कमी करण्यासही मदत करते.

असे करा

एक ग्लास पाण्यात दालचिनीचा तुकडा टाका. यात अद्रक आिण हळद मिसळा. काही वेळ उकळा, नंतर गाळून घ्या आिण कोमट झाल्यावर प्या.

या पेयांमुळेही होईल डिटॉक्सिफाय

- काकडी आिण पुदिना

- ब्लॅकबेरी आिण संत्री

- टरबूज आणि पुदिना

- संत्री आिण लिंबू

- स्ट्रॉबेरी आिण तुळस

- सफरचंद आिण दालचिनी

मागे

ताक प्याल तर घटेल चरबी,आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील.
ताक प्याल तर घटेल चरबी,आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील.

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत....

अधिक वाचा

पुढे  

UTI इन्फेक्शनमुळे वाढू शकतात किडनीचे आजार, या उपायांनी होऊ शकतो बचाव
UTI इन्फेक्शनमुळे वाढू शकतात किडनीचे आजार, या उपायांनी होऊ शकतो बचाव

बरेचदा UTI इन्फेक्शन मुळे किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. यापासून बचाव करण्य....

Read more