By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 07:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एका निरोगी शरीराचे लक्षण आहे शरीरात प्लेट्लेट्सचे योग्य प्रमाण असणं आणि त्यांनी योग्यरीत्या काम करणं. परंतु प्लेट्लेट्सच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरास आणि आरोग्यास त्रास सहन करावा लागतो. आपल्या खाण्यापिण्यामुळे आपण सहजरीत्या प्लेट्लेट्सची संख्या वाढवू शकता.
1 प्रथिनं, व्हिटॅमिन, ए, सी, के, फोलेट, झिंक, फॉलिक ऍसिड, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध आहार घेतल्यास प्लेटलेट्स वाढविण्यासाठी प्रभावी सिद्ध होईल.
2 आपल्या आहारात दही, आवळा, लसूण, ग्रीन टी तसेच नारळ पाणी आणि डाळिंब, पपई, सफरचंद, बीट सारख्या फळांचा समावेश करावा. तसेच पपईच्या पानाचा रस पिणं देखील फायदेशीर उपाय आहे.
3 दररोज कोरफडच सेवन करणं देखील फायदेशीर आहे. दररोज 20 ते 25 ग्रॅम कोरफडच गीर खावं किंवा त्याचा रस प्यावा.
4 गव्हांकुर प्लेटलेट्स वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. दररोज अनोश्यापोटी याचा रस प्यायल्याने प्लेटलेट्सची संख्या हळू हळू वाढते.
5 गिलोयचा वापर - गिलोयचा वापर देखील या साठी रामबाण उपाय आहे. गिलोय आणि तुळस एकत्ररीत्या चांगल्या प्रकारे उकळवा आणि काढा तयार करा. या काढ्याचा वापर दररोज केल्यानं फायदा होईल.
निरोगी आहार, व्यायाम आणि वेळेवर झोपणं या अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोग प....
अधिक वाचा