By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 06:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरसची लोकांच्या मनात भीती बसली आहे. यापासून सुरक्षा म्हणून प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. गरम पाणी पिण्याने किंवा गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना विषाणूचा धोका टाळता येऊ शकतो असे म्हटले जात आहे. डॉक्टरांचा देखील विश्वास आहे की स्टिम थेरेपीमुळे विषाणू जिवंत राहण्याची शक्यता नाहीशी होते. त्यामुळे वाफ घेणे योग्य ठरेल.
वाफ घेण्याची सोपी पद्धत
एका पातेल्यात एक-दोन ग्लास पाणी उकळून घ्या.
पातेलं गॅसवरुन खाली उतरवून घ्या.
डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ नाकाने घेऊन तोंडाने सोडावी तसेच तोंडाने घेऊन नाकाने सोडावी.
त्याचप्रमाणे एका नाकपुडीने घेऊन दुसर्या नाकपुडीने सोडावी व परत दुसर्या नाकपुडीने करावे.
वाफ घेण्यासाठी केवळ गरम पाणी पुरेसं आहे तरी आपल्या आवश्यकतेप्रमाणे यात चिमूटभर हळद आणि सेंधा मीठ घालून देखील वाफ घेता येऊ शकते.
कोरोना विषाणूवर ही सर्वात सुरक्षित, प्रभावी आणि स्वस्त पद्धत आहे. दिवसातून एक किंवा दोनदा वाफ घेणं योग्य ठरेल. याहून अधिक वेळा वाफ घेतल्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. आपण सकाळी किंवा संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान वाफ घेऊ शकता.
दुधाचे पोषण हे अमृतासारखेच आहे आणि तुळस औषध म्हणून वापरली जाते जे आपल्या रो....
अधिक वाचा