ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पावसाळ्यातील कपड्यांच्या दुर्गंधीचे उपाय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 03, 2019 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पावसाळ्यातील कपड्यांच्या दुर्गंधीचे उपाय

शहर : मुंबई

पावसाळ्यात वेगवेगळ्या समस्याही डोकं वर काढू लागतात. वेगवेगळ्या समस्यांमध्ये धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या सगळ्यांसाठीच फार डोकेदुखीची ठरते. याने होतं असं की, तुम्हालाही दुर्गंधीचा त्रास होतो आणि तुमच्या सोबतच इतरांनाही त्रास होतो. अनेकांना ही समस्या कशी दूर करायची हे माहीत नसतं. त्यामुळे आम्ही काही टीप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी येण्याचं कारण?

पावसाळा सुरु होताच कपड्यांना एक वेगळाच दमट वास यायला लागतो. अनेकदा घाम आणि पावसाचं पाणी एकत्र झाल्यानेही हा वास येतो. त्यामुळे अनेकांना चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. अशात यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही ही दुर्गंधी दूर होत नाही. त्यामुळे काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कपडे धुतल्यानंतर चांगले पिळायला हवे

पावसाळ्या उन कमी पडतं त्यामुळे सुकायला घातलेल्या कपड्यांचा वास यायला लागतो. अशात कपडे धुतल्यानंतर त्यातील पाणी चांगल्याप्रकारे पिळायला हवं. कपड्यांमधील पाणी पूर्णपणे निघाल्यावर कपडे फॅनच्या हवेत सुकायला ठेवा.

इस्त्री करा

धुतलेल्या कपड्यांमध्ये आताही वास येत असेल तर ते कपडे वापरण्याआधी एकदा इस्त्री करा किंवा रात्रीच त्या कपड्यांना इस्त्री करुन फॅनच्या हवेखाली ठेवा. इस्त्री केल्यामुळे कपड्यांचा वास पूर्णपणे निघून जातो.

कपडे उघड्यावर ठेवा

अनेकदा पावसाळ्यात घरात एकप्रकारचं दमट वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कपड्यांनाही एक वेगळाच वास यायला लागतो. अशावेळी धुतलेले कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा मोकळ्या हवेत ठेवा.

परफ्युम-डिओड्रन्ट

पावसाळ्यात घामाच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी डिओचा वापर करा. बाहेर जाताना बॅगमध्ये डिओ सोबत ठेवा. कपड्यांचा अधिकच वास येत असेल तर डिओचा वापर करु शकता.

एक्स्ट्रा कपडे ठेवा

पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपड्यांची एक जोडी सोबत ठेवा. कारण पावसात भिजल्यानंतर कितीही डिओचा वापर केला तरी कपड्यांना वास येतोच. त्यामुळे सोबत कपडे सोबत ठेवल्यास ते तुम्ही बदलू शकता

या गोष्टींचीही घ्या काळजी

1) पावसाळ्यात उन कमी पडत असल्याने कपडे कमी धुवायला काढले तर चांगलं.

2) कपडे सुकवण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करा. हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांखाली न्यूज पेपर ठेवा. पेपर पाणी शोषूण घेतो.

3) कपडे धुतल्यानंतर काही वेळ पाणी झरण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर ते मोकळ्या जागेत सुकायला ठेवा.

 

 

मागे

स्मार्टफोनचे दुष्परिणाम
स्मार्टफोनचे दुष्परिणाम

हल्ली मुलं सतत स्मार्टफोनवर खेळत असतात. त्यांना सर्व येतं म्हणून आधी कौतुक....

अधिक वाचा

पुढे  

हि लक्षणं दिसल्यास तो कॅंसर असू शकतो?
हि लक्षणं दिसल्यास तो कॅंसर असू शकतो?

आपलं आरोग्य हे सर्वात मोठ आपल्याला मिळालेलं धन आहे. खरतर असं म्हणतात की पहिल....

Read more