By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2019 10:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चहाच्या ठेल्यावर किंवा कॅफेत नेहमी लोकांना थर्माकोलच्या कपात चहा किंवा कॉफी पिताना बघितले असेल. बरेच लोक स्टीलच्या किंवा काचेच्या ग्लासमध्ये चहा पिण्याचे टाळतात कारण त्याचे मुख्य कारण ते हाईजीनला देतात. आजकाल लोकांच्या घरात होणार्या पार्टी-फंक्शनमध्ये देखील जास्तकरून थर्मोकोलच्या प्लेट, वाट्या आणि कपाचा प्रयोग करण्यात येतो, ज्याने करून भांडे धुवण्याच्या झंझटीपासून बचाव होतो.
पण तुम्हाला थर्माकोलचे साइड इफेक्ट्स माहीत आहे का? जेवढ्या धोक्याचे प्लास्टिक आहे, तेवढ्याच धोक्याचे थर्मोकोलचा कप ही आहे. हे पुढे जाऊन कँसर सारख्या आजाराचे कारण देखील बनू शकतात. तर जाणून घेऊ यामुळे होणार्या समस्या.
कर्क रोगाची समस्या
विशेषज्ञांचे मानले तर थर्माकोलचे कप पॉलीस्टीरीनपासून बनलेले असतात, जे आमच्या आरोग्यासाठी फारच नुकसानकारक आहे. अशात हे गरजेचे आहे की जेवढे होऊ शकते याचा वापर कमीत कमी करावा. जेव्हा आम्ही थर्माकोलच्या कपात गरम चहा घालून पितो तर याचे काही तत्त्व गरम चहात मिसळून पोटात जातात आणि हे शरीरात जाऊन कँसर सारख्या आजारांना निमंत्रण देतात. या कपात उपस्थित स्टाइरीनमुळे तुम्हाला थकवा, अनियमित हॉर्मोनल बदल शिवाय अजून ही बर्याच समस्या येऊ शकतात.
ऍलर्जी
जर तुम्ही नियमित रूपेण प्लास्टिक किंवा थर्मोकोलच्या कपात चहा, कॉफी किंवा गरम पदार्थांचे सेवन करत असाल आणि तुम्हाला अॅलर्जी झाली तर याचे मुख्य कारण हे कप असू शकतात. बॉडीवर रॅशेज येऊ लागतील आणि हे हळू हळू जास्त प्रमाणात वाढू लागतात. थर्मोकोलच्या वापरामुळे झालेल्या अॅलर्जीचे मुख्य कारण गळ्यात दुखणे यापासून सुरू होते.
पोट खराब
पोट खराब होणे देखील थर्मोकोलच्या डिस्पोझेबलचे नियमित वापर करणे असू शकते कारण हे पूर्णपणे हायजीनिक नसतात. यात गरम वस्तू टाकल्यानंतर यात उपस्थित बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया यात विरघळतात आणि शरीरात पोहोचून जातात.
पचन तंत्र खराब
हे कप थर्मोकोलद्वारे तयार केले जातात, आणि यातून चहा किंवा खाण्याचे सामान बाहेर निघू नये म्हणून यावर वॅक्सचा थर चढवण्यात येतो. जेव्हा आम्ही चहा किंवा कॉफीचे सेवन करतो, तर त्यासबोत वॅक्स देखील आमच्या बॉडीत जातो. यामुळे आतड्यांची समस्या आणि इन्फेक्शन होण्याचे धोके वाढून जातात. आणि याचा प्रभाव आमच्या पचन तंत्रावर देखील पडतो.
गर्भवती महिलेचे आरोग्य हा काळजी घेण्याजोगा विषय असतो. या नाजूक अवस्थेत स्त....
अधिक वाचा