ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फणसातील पौष्टिक गुणधर्म

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 12, 2019 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फणसातील पौष्टिक गुणधर्म

शहर : मुंबई

सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असं फळ किंवा अशी भाजी आहे ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीतफणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात.

व्हिटॅमिन , सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह यांचा फणसात मोठय़ा प्रमाणात समावेश असतो.

पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.

फणसात मोठय़ा प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.

भरपूर प्रमाणात लोह असल्याने अँनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं.

थायरॉईडचा त्रास असणार्याा लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांसाठी गुणकारी असते.

फणसात असलेले व्हिटॅमिन '' आणि 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.

फणसात असणारे व्हिटॅमिन '' डोळ्यांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीसुद्धा तो फायदेशीर ठरते.

 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

मागे

एखाद्याला मिठी मारल्यानंतर का कमी होतो व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक त्रास
एखाद्याला मिठी मारल्यानंतर का कमी होतो व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक त्रास

जादूची झप्पी देणे-घेणे म्हणजेच गळाभेट घेणे उतरत्या वयाच्या लोकांसाठी फिट र....

अधिक वाचा

पुढे  

आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे
आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे

21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येईल. ज्याची ....

Read more