By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 03:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सध्या सणावाराच्या निमित्ताने घरोघरी आरत्या सुरू असतात. आरतीच्या वेळी कापूर जाळून वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.कापराच्या ज्वलनाने वातावरणात एक प्रकारचा सुगंध पसरतो. याच कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: केसांचे आरोग्यराखताना कापराचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. कापराच्या तेलाने केसांचे आरोग्य चांगले राहतेच त्याचबरोबर कोंडाही कमी होतो. बाजारात
कापराचं तेल विकत मिळतंच; पण घरीदेखील ते बनवता येतं. ही प्रक्रिया अगदी साधी आहे. शुद्ध खोबरेल तेलात कापराच्या वड्याटाकाव्यात आणि हवाबंद बाटलीत हे तेल साठवावं. यामुळे कापराचा वास उडून जात नाही. कापराचा सुवास मन शांत करणारा आहे.कापराच्या तेलाने १५ ते २0 मिनिटे डोक्याला मसाज केल्यास केसांचे आरोग्य सुधारते. या मसाजनंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल
केसांभोवती लपेटावा अथवा केसांवर गरम वाफ घ्यावी. यामुळे तेल केसात मुरण्यास मदत होते. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवूनटाकावेत. कापराची अँलर्जी असू शकते म्हणूनच वापर करण्याआधी चाचणी घ्यावी.
डायबेटिसच्या रूग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग....
अधिक वाचा