ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जीवघेण्या मलेरियाचा इतिहास आणि त्याची लक्षणे…

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जीवघेण्या मलेरियाचा इतिहास आणि त्याची लक्षणे…

शहर : मुंबई

जगभरात अनेक देश डासांपासून होणाऱ्या आजारांविरुद्ध लढा देत आहेत. दरवर्षी या आजारातून मरणाऱ्या लोकांची संख्या लाखोंमध्ये पोहोचते. अशाच एका जीवघेण्या मलेरियाचा इतिहास आणि कारणांचा आपण शोध घेत आहोत.

असा झाला उगम

मलेरिया इटालियन भाषेतील शब्द माला आणि एरिया यातून निघाला आहे. याचा अर्थ वाइट वायू असा होता. या आजाराचे सर्वात जुने वर्णन चीनमधून मिळते. त्यालाच दलदली ताप (Marsh Fever) असेही म्हटले जाते. 1880 मध्ये मलेरियावर सर्वप्रथम अभ्यास करण्यात आला. चार्ल्स लुइस अल्फोन्स लॅव्हेरिस यांनी पहिल्यांदा यावर अध्ययन केले होते.

कारण -

मलेरिया मादा एनाफिलीज डासाच्या चावल्याने होतो. त्यामुळे, डासांपासून नेहमीच सावध राहावे. प्रामुख्याने पावसाळ्यात खास काळजी घ्यावी. याच वातावरणात डासांच्या चावल्याने जीवघेणे आजार होऊ शकतात.

ही आहेत लक्षणे

- थंडी वाजून ताप येणे

- ताप उतरल्यानंतर घाम सुटणे

- ब्लड शुगरचे प्रमाण कमी होणे

- थकवा, डोकेदुखी, मसल्स पेन

- पोटाच्या समस्या आणि उलट्या होणे

- शुद्धीत नसणे, रक्त कमी होणे, एनीमिया

यापैकी कुठलीही लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपले रक्त तपासून घ्यावे...

 

मागे

तुम्हीसुद्धा सॅनिटायझरचा वापर अधिक करत असाल तर होणाऱ्या नुकसानीबद्दल जाणून घ्या...
तुम्हीसुद्धा सॅनिटायझरचा वापर अधिक करत असाल तर होणाऱ्या नुकसानीबद्दल जाणून घ्या...

आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत ज्यांना आपण स्वच्छतेच्या नावावर सॅनिटा....

अधिक वाचा

पुढे  

मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना
मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना

जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपा....

Read more