By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
'द लॅसेंट' नामक मेडिकल पत्रिकेत प्रकाशित माहितीनुसार मलेरिया बाबत धक्कादायक बाब समोर आली असल्याचे दिसते. दक्षिणपूर्व आशियामध्ये 80 टक्के मलेरियाच्या जंतूनी सध्याच्या प्रचलित औषधांवर वर्चस्व प्रस्थापित केले असल्याचे दिसून येत आहे. सध्या मलेरिया साठी आर्टिमीसिनिन आणि पिपॅरॅक्विन ही औषध उपचारदाखल दिली जातात. मात्र आता त्या औषधाची रूग्णाला आजारंपणातून बाहेर काढण्यासाठी असलेली मदत तोकडी असल्याचे दिसत आहे. मलेरियाच्या जंतूनी या औषधांवर मात करत आपल जीवन शाबूत ठेवले असल्याचे दिसते. या जंतूंनी कंबोडिया, लाओस आणि थायलंड ते व्हिएतनामपर्यंत आपले साम्राज्य पसरले आहे. मलेरियाला कारणीभूत असणार्या प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम हा जंतू सर्व औषधांना कुचकामी ठरवत असल्याचे दिसून येतेय.
ही खूपच चिंतेची आणि शास्त्रज्ञाना आव्हान देणारी गोष्ट आहे.मात्र अस असले तरीही सध्याच्या परिस्थितीवर मात करता येइल. आणि चालू असलेल्या औषधासोबत इतर ही औषध देण्याची गरज निर्माण झाली आहे.
केइएम रुग्णालयात स्वाइण फ्लू मुले गोवंडी येथे राहणार्या दानिश्ता खान ....
अधिक वाचा