ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गोमूत्राचे औषधी गुणधर्म

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 07:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गोमूत्राचे औषधी गुणधर्म

शहर : मुंबई

गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गोमूत्रातल्या गुणकारी घटकांमुळे गंभीर आजारही बरा होत असल्याचा दावा करण्यात येतो. गोमूत्राचे सेवन लाभदायी ठरू शकते. गोमूत्रात जंतूविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे गोमूत्रामुळे विविध जंतूंचा नाश होतो. जंतूंमुळे निर्माण होणारे आजार यामुळे बरे होऊ शकतात.

आयुर्वेदानुसार वित्त, वात आणि कफ दोषांचे असुंतलन विविध विकारांना कारणीभूत ठरते. या त्रिदोषांना नियंत्रणात ठेउन आणि बरे करण्याची क्षमता गोमूत्रात असते. त्यामुळे याच्या नियमित सेवनावर भर देण्यात आला आहे.यकृताचे आरोग्य टिकवून ठेवण्यात गोमूत्राची महत्वाची भूमिका असते. यकृताच्या कार्यात बिघाड झाला तर अनेक विकारांना निमंत्रण मिळते. मात्र गोमूत्रामुळे यकृताला बळ मिळते आणि त्याचे कार्यही सुधारते.गोमूत्रात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत. गोमूत्राचे नियमित सेवन केले तर शरीराचा व्याधींपासून बचाव होतो. जंतूंशी लढण्यासाठी शरीर सक्षम बनते.गोमूत्रात नैसर्गिक खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. शरीरातल्या खनिजांची कमतरता भरून काढणे यामुळे शक्य होते. गोमूत्रातून शरीराला आवश्यक ती पोषणमूल्ये मिळतात.

 

मागे

दिवसातून एकदा जेवत असाल तर…….
दिवसातून एकदा जेवत असाल तर…….

अनेक लोक डायटिंग करण्याच्या नादात दिवसातून एकदाच आहार घेणे योग्य समजतात. य....

अधिक वाचा

पुढे  

व्हिटॅमिन डी मुळे कॅन्सरवर नियंत्रण
व्हिटॅमिन डी मुळे कॅन्सरवर नियंत्रण

व्हिटॅमिन डी मुळे यकृताच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, असे एका ....

Read more