By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
व्हिटॅमिन बी ६ युक्त आहार -: व्हिटॅमिन बी ६ मुळे रोग प्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे नैराश्य, तणाव यासारखे आजार होत नाहीत. मिरची, पेरू, लसूण असे अनेक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी ६ आढळते. तसेच हे जीवनसत्त्व डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते.
केळी -: केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
नारळ -: पावसाळ्याच्या दिवसात चेहरा तेलकट होणे ही समस्या तरुणींसमोर उभी राहते. त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेहऱ्याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राहण्यास मदत होईल. आयुर्वेदाच्या मते, नारळाचे पाणी थंड असते. हे पाणी पिल्याने पित्त आणि वातापासून तुम्ही लांब राहू शकता तसेच मूत्राशयाची स्वच्छताही होते.
व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ -: व्हिटॅमिन ई हे शरीरातील जंतूशी लढण्याची ताकद देते. शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. अंडे, सुका मेवा, पाजेभाज्या, ब्रोकली, आंबा, पपई यांसारख्या पदार्थातून व्हिटॅमिन ई मिळण्यास मदत होते.
टोमॅटो -: टोमॅटोमुळे आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. टोमॅटोमुळे युरिन इन्फेक्शन दूर होते. तसेच रक्त शुद्ध होण्यासही मदत होते. पचनक्रिया सुधारण्यास बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास टोमॅटो फायदेशीर ठरतो. पालक ज्यूसमध्ये टोमॅटो मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते. युरिन इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते तसेच रक्त शुद्ध होण्यासाठीदेखील मदत होते.