ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अवलंबा पाणी पिण्याचे 5 नियम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अवलंबा पाणी पिण्याचे 5 नियम

शहर : मुंबई

जेवणानंतर पाणी पिऊ नका. जेवण करण्याच्या एक तास आधी पाणी प्यावे

1. सकाळी उठताच उपाशीपोटी कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ दूर होतील. तसेच तुमचा मेटॅबॉलिझम रेट सुधारेल वजन कमी होईल. पाणी पिण्याची ही पद्धत हृदयाला निरोगी ठेवण्यात सहायक ठरते.

2. ब्रश केल्यानंतर एक ग्लास पाणी प्या. तुम्ही ब्रश केल्याच्या अर्धा तास किंवा ४५ मिनिटानंतरही पाणी पिऊ शकता. याने पचनक्रिया चांगली राहते. पाणी पिल्याच्या अर्ध्या तासानंतरच काहीतरी खावे. पाणी वेगाने पिऊ नये.

3. जेवणानंतर पाणी पिऊ नका. जेवण करण्याच्या एक तास आधी पाणी प्यावे आणि जेवण झाल्याच्या दोन तासांपर्यंत पाणी पिऊ नये. यामुळे मेटॅबॉलिझम वाढतो आणि वजन कमी करण्यातही भरपूर मदत मिळते.

4. पाणी हळूहळू प्यावे. याशिवाय तुम्ही एक ग्लास पाणी पिण्याच्या अर्ध्या तासानंतरच दुसरा ग्लास पाणी प्यावे. जर तुम्ही घाई-घाईत पाणी पीत असाल तर त्याचा पचनक्रिया आणि भुकेवर परिणाम होतो.

5. उभे राहून पाणी पिल्याने शरीराचे लिक्विड बॅलन्स बिघडते. यामुळे शरीराच्या सांध्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच संधिवाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उभे राहून पाणी पिणे टाळावे.

मागे

हिवाळ्यात उटणे हे फायदेशीरच
हिवाळ्यात उटणे हे फायदेशीरच

दिवाळीच्या गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मजा काही औरच असते.....

अधिक वाचा

पुढे  

डायबेटीजसाठी शुगर फ्रीचा अतिरेक धोकादायक
डायबेटीजसाठी शुगर फ्रीचा अतिरेक धोकादायक

आज १४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे. भारतात ६ कोटींहून अधिक रूग्ण डायबेटी....

Read more