ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कॅन्सरपासून हृदयरोगापर्यंत शलगमची भाजी या समस्यांवर रामबाण उपाय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 10:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कॅन्सरपासून हृदयरोगापर्यंत शलगमची भाजी या समस्यांवर रामबाण उपाय

शहर : मुंबई

हिवाळ्यात आढळणारे शलगम ही खूप पौष्टिक भाजी आहे. याच्या पानांमध्येही भरपूर पोषकतत्व आढळतातय. सलाड असो किंवा त्याची भाजी. दररोज सलगम खाल्ल्याने हृदयरोगापासून ते कर्करोगाचा धोका कमी करण्यापर्यंत अनेक बाबतीत ही भाजी फायदेशीर ठरते. शलजम खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

हिवाळ्यात येणाऱ्या अनेक भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अशीच एक भाजी म्हणजे सलगम. फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची ही भाजी अतिशय पौष्टिक आहे. विशेष म्हणजे सलगम ही अतिशय चविष्ट आणि सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. सलगम हे सॅलड, भाजी किंवा त्याची पानांची देखील भाजी केली जाते. शलजममध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. सलगममध्ये अ, ब, क, ई आणि के जीवनसत्त्व आढळतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम देखील मुबलक प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात सलगम खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत

शलगममध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीडायबेटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार, सलगममध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यात मदत

सलगम हा फायबरचा चांगला स्रोत आहे. हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे जास्त भूक लागत नाही. सलाड आणि भाजी म्हणून सलगम वापरल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तुमच्या आहारात नियमितपणे याचा समावेश करा.

कॅन्सरचा धोका कमी करते

शलगममध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. जे कर्करोगापासून आपला बचाव करतात. शलजमची भाजी फक्त धोका कमी करू शकते. कर्करोग कमी करू शकत नाही.

रक्तदाब नियंत्रित करते

शलगममध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सलगममध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

सलगममुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. शलगममध्ये व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्व चांगल्या प्रमाणात असतात जे डोळे मजबूत करतात. सलगमच्या पानांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही दोन संयुगे आढळतात जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असतात.

पुढे  

जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव
जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव

आरोग्यासाठी कोणतीही गोष्ट नियंत्रणात असली तरच ती फायदेशीर ठरु शकते. कोणत्य....

Read more