By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संवेदनशील त्वचेवर प्रत्येक ऋुतूचा परिणाम पटकन होतो. जर तुमची त्वचाही अशी असेल तर ऋुतू बदलल्यावर तिची विशेष काळजी अवश्य घ्या. त्वचेचे हे ४ संकेत संवेदनशील असल्याकडे इशारा करतात.
१. रेडनेस त्वचा लाल होणे हे संवेदनशील त्वचेचा संकेत आहे. जास्त वेळ उन्हात राहणे किंवा ज्याची अलर्जी आहे अशा वस्तूच्या संपर्कात आल्यास तुमची त्वचा लाल होते. असे फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही होऊ शकते. चिखल किंवा पाण्यात अधिक वेळ राहिल्यामुळेदेखील त्वचा लाल होऊ शकते.
२. रॅशेज ज्यांनी त्वचा संवेदनशील असते त्यांना त्वचेवर रॅशेजची समस्या लगेच होते. सारखे सारखे त्वचेवर रॅशेज किंवा छोटे छोटे लाल पुरळ येणे याचा संकेत आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्ट वापरल्यानंतर रॅशेज येत असतील तर याचा वापर करणे बंद करा. या अवस्थेत सिंथेटिक कपडे घालू नका. रॅशेजवर नारळाचे तेल किंवा मॉश्चराइजर लावल्यास आराम मिळतो.
३. खाज गरम पाण्याचा जास्त वापर करणे किंवा हॉट शॉवर घेतल्यानंतर जर त्वचेला खाज येत असेल तर तुमची त्वचा संवेदनशील आहे. याशिवाय उग्र क्लिंजिग प्रॉडक्टचा वापर केल्यासही त्वचेवर खाज येते. दमट वातावरणात ही समस्या अधिक वाढते.
४. जळजळ कित्येकवेळा जेल, अल्कोहल किंवा अँटीएंजिग उत्पादनाच्या अति वापरामुळे काही लोकांच्या त्वचेवर जळजळ होते. वातावरणात कोरडेपणा वाढल्यामुळे ही समस्या वाढते. जर तुम्हाला वारंवार त्वचेवर जळजळ होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका, तर डॉक्टरांना अवश्य दाखवा.
महागडी उपकरणे आणि अधिक कष्ट न घेता वजन कमी करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे मॉ....
अधिक वाचा