By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 07:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हल्ली मुलं सतत स्मार्टफोनवर खेळत असतात. त्यांना सर्व येतं म्हणून आधी कौतुकही वाटतं परंतू मुलांसाठी याचा वापर योग्य नाही. याने मुलांची सर्जनशीलता कमी होते. मुलांना स्मार्टफोन हाती घेण्यापूर्वी हा विचार करावा:
* मुलांना दिवसभरातून केवळ तासभरच स्क्रीन मीडियाचा वापर करायला हवा.
* सतत मोबाइल वापरल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. ड्राय आइज, कल्पनाशक्ती कमी होणे, अंगठा दुखणे अश्या समस्या
निर्मित होतात.
*आउटडोर खेळण्याऐवजी हल्ली मुलं स्मार्टफोनवर गेम्स खेळणे पसंत करतात ज्याने शारीरिक दुष्परिणाम समोर येतात आणि कल्पनाशक्ती कमी होते. त्याऐवजी बाहेर खेळणे, वाचणं, चित्र काढणं यावर भर दिला पाहिजे.
*फोनवर तासोतास राहणारी मुलं एकलकोंडी होतात. अशी मुलं सोशल होत नाही आणि त्यांचे मित्रही फार नसतात. त्यांना स्वत:च्या जगात रमायला आवडायला लागतं जे योग्य नाही.
*अश्या मुलांना झोपही कमी येते. ज्यांचा सरळ परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि दैनिक कामांवर पडतो.
*फोनच्या कृत्रिम प्रकाशामुळे डोळ्याचं आरोग्य बिघडतं. लवकर चष्मा लागण्याची शक्यता वाढते.
*सतत फोन वर असलेल्या मुलांची विचारशक्ती खुंटते, ज्याचा परिणाम रिझल्टवर दिसून येतो.
हिंदू शास्त्रात आणि आयुर्वेदात भोजन संबंधी काही माहिती देण्यात आली आहे. जस....
अधिक वाचा