By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात. त्याचसोबत कॅलरी वाढवणारे, अनावश्यक फॅट्स किंवा कोलेस्ट्रेरॉल वाढण्याचा धोका कमी असतो.कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मांसाहारासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.जंताची समस्या कमी करण्यास मदत करते. अॅन्टीऑक्सिडंट्स घटक अॅकलर्जीचा धोका कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.सोलकढीमध्ये आलं-लसणाची फोडणी असल्याने सर्दी, मळमळ, पचनक्रियेत बिघाड झाल्याने वाढणारी अस्वस्थता कमी करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.अपचानाचा त्रास कमी करण्यासोबतच कोकम मेंदूच्या कार्याला चालना देण्यासही मदत करते. शरीरावरील आणि मनातील ताण हलका होण्यास मदत होते.
डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे जेवणानंतर सोलकढीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे.जेवणानंतर मधूमेहींनी 1-2 ग्लास सोलकढी पिणं फायदेशीर आहे.
सदैव ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चा....
अधिक वाचा