By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 30, 2020 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
१. मध- अनेक संशोधनानुसार घसा खवखवत असल्यास मध अत्यंत उपयुक्त ठरतो. यामुळे घशाचे संरक्षण होते. यात अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तथापि एक वर्षापेक्षा लहान बालकांना हे न देण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे बोटुलिझमचा धोका असतो.
२. फ्रोझन फूड्स- घसा दुखत असल्यास आइस्क्रीम खाणे फायदेशीर ठरेल. डेव्हिड जेफेन स्कूल ऑफ मेडिसीनच्या शोधानुसार, फ्रोझन फूड जसे की, पॉपस्किल्स, फ्रोझन योगर्ट खाल्ल्याने घशाच्या वेदना कमी होतात.
३. चहा- गरम चहादेखील घशासाठी अतिशय फायदेशीर आहे. संशोधनानुसार, आलं, तुळस आणि कॅमोमाइल असलेला चहा प्यायल्याने घशाचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
४. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या- मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा अतिशय प्राचीन उपचार आहे. अनेक संशोधनानुसार, यामुळे घशाची सूज कमी होते आणि तोंड स्वच्छ राहते. सकाळी लवकर उठून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास जास्त फायदा होतो. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात.
५. बटाटे- बटाटे उकळून घ्या, नंतर मॅश करा. गरम झाल्यानंतर एका कपड्यात बांधून घ्या. नंतर दुसरा कपडा लावा. नंतर याला गळ्याभोवती बांधून घ्या. हे हीटिंग पॅडप्रमाणे काम करते.
६. लसूण - अनेक संशोधनानुसार लसणामध्ये अँटिमायक्रोबियल गुणधर्म असतात, ज्यामुळे घशाला मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
संचारबंदीच्या काळात घाबरलेले हजारो स्थलांतरित घरे गाठण्यासाठी जीवाची बाज....
अधिक वाचा