ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पावसाळ्यात मोड आलेल्या कडधान्यापासून राहावं लांब

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 07:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पावसाळ्यात मोड आलेल्या कडधान्यापासून राहावं लांब

शहर : मुंबई

तसं तर अंकुरलेले किंवा मोड आलेले कडधान्य आरोग्यास खूप फायदेशीर आहे आणि हे आपल्या आहारात नियमित रुपात समाविष्ट केल्याने आपल्या आरोग्य आणि सौंदर्याचे बरेच फायदे मिळू शकतात. परंतु प्रत्येक निरोगी वस्तू प्रत्येक वेळी एकसारखे परिणाम देईल असे काही जरुरी नाही. होय, अंकुरलेले किंवा मोड आलेले कडधान्य किती ही फायदेशीर असले तरी पावसाळ्यात हे खाणे आपल्यासाठी हानिकारक होऊ शकते.

आता आपण विचारात पडला असाल की मोड आणलेले किंवा अंकुरलेले कडधान्य आरोग्यास कसे काय हानिकारक आहे ..तर आम्ही आपणास त्याचे कारण सांगत आहोत.

वास्तविक मेघसरींमध्ये अन्नातून विषबाधा आणि पोट बिघाड होण्याचे त्रास सर्वात जास्त होतात. यामागील सर्वात मोठे कारण पाणी किंवा इतर पदार्थांमध्ये असलेले जिवाणूंमुळे होणारे संसर्ग, जे आपल्या पोटालाच खराब करत नाही तर उलट्या आणि अतिसार सारख्या समस्यांना देखील जन्म देऊन आपल्या साठी धोकादायक ठरू शकतात.

आहारतज्ज्ञ या हंगाम्याच्या काळात अंकुरलेले कडधान्य खाण्याचा सल्ला देतात, याचे पहिले कारण असे की हे बऱ्याच काळ पाण्यात भिजवलेले असतात आणि त्यापेक्षा या मध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो अशामुळे त्यामध्ये धोकादायक जिवाणू होण्याचा धोका आणखीनच वाढतो.

दुसरे कारण असे की या मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. जे पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. अश्या परिस्थितीत, अतिसार सारखी समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे शरीरात पाणी आणि पोषकतत्वांची कमतरता होऊ शकते.तथापि, जर आपणास या हंग्यामात अंकुरलेले कडधान्य खावयाचे असल्यास, आपण याला चांगल्या प्रकारे उकळवावे आणि ताजे असताना वापरावे, जेणे करून या मुळे आपणांस काहीही त्रास होऊ नये.

मागे

CoronaVirus : या सोप्या टिप्सने घरगुती कापड्यांना निर्जंतुक करावं
CoronaVirus : या सोप्या टिप्सने घरगुती कापड्यांना निर्जंतुक करावं

कोविड -19 टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या सावधगिरी बाळगल्या जात आहेत जेणे करून य....

अधिक वाचा

पुढे  

रात्र भरात गुडघेदुखी गायब होणार,फक्त हे देशी उपाय करून बघा
रात्र भरात गुडघेदुखी गायब होणार,फक्त हे देशी उपाय करून बघा

गुडघेदुखीच्या होणाऱ्या त्रासापासून आजच्या काळात वृद्धच नव्हे तर आजची तरु....

Read more