By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 03:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारीरिक मरगळ कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉइंटमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणी खर्चिक अपॉइंटमेंट्स घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या 'पादाभ्यंग' या सहज सोप्या आणि घरच्या घरीही करणे शक्य असलेल्या प्रभावी उपचार पद्धतीबाबत जाणून घ्या.
पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहेरात हमखास दिल्या जाणाऱ्या काशाच्या वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे. पादाभ्यांग / पायाला मसाज करताना काशाच्या वाटीचा कशा प्रकारे वापर करावा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत ...
काशाची वाटी म्हणजे काय ?
कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून काशाची वाटी बनवली जाते.
शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काशाची वाटी प्रभावी ठरते. पायाला तेल, तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला / उपचार पद्धतीला पादाभ्यंग म्हणतात. आबालवृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदानुसार डोके, कान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. वेळीच त्याचा निचरा न झाल्यास शरीरात काही दोष, आजार वाढण्याची शक्यता बळावते.
मसाज करण्याची योग्य वेळ कोणती ?
रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शरीरात थंडावा निर्माण होऊन शांत झोप मिळण्यास मदत होते. यासोबतच सकाळी अंघोळीपूर्वी अर्धा तासदेखील मसाज करणे फायदेशीर ठरते.
मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ?
काशाच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तुपाचा वापर करणे आवश्यक आहे. तुपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तिळाच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. पायाला पडलेल्या भेगा भरण्यासाठी भिंडेल किंवा कोकमचे तेल फायदेशीर ठरते.
जेवणानंतर लगेच कुणी ढेकर दिला की त्याचे पोट भरले असे मानले जाते. ढेकर म्हणजे....
अधिक वाचा