By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महागडी उपकरणे आणि अधिक कष्ट न घेता वजन कमी करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे मॉर्निंग वॉक. एका संशोधनानुसार आठवड्यातन ६ ते ९ मैल सकाळी चालणाऱ्या लोकांचे शरीर निरोगी राहते व ते दीर्घायुषी राहतात. तसेच ४५ मिनिटांचा वॉक ७ दिवस केल्याने २ किलो वजन कमी होते.
हृदयरुग्णांसाठी फायद्याचा
सकाळी वॉक केल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते. दररोज ३० मिनिटांचा वॉक केला तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी राहतो. शरीरात कोलेस्ट्रेरॉलचा स्तर कमी करण्यातही यामुळे मदत मिळते.
महिलांमध्ये कॅन्सरचा धोका कमी होतो
महिलांच्या आरोग्यासाठी सकाळचा वॉक खूप फायद्याचा ठरतो. नियमितपणे चालणाऱ्या महिलांमध्ये कोलोन कॅन्सरचा धोका वॉक न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत ३१ टक्के कमी होतो. ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वॉक केल्याने ५० टक्क्यांपर्यंत कम होतो.
हेदेखील आहेत फायदे
- वॉकमुळे एन्डॉरफिन्स हार्मोन सक्रिय होत असल्याने तणाव कमी राहतो.
- डिप्रेशन दूर होण्यासोबतच याने स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते.
- वॉकमुळे हाडे दुखत नाहीत.
- शरीर ऊर्जावान राहते आणि यामुळे सर्जनशीलता वाढते.
- कोणत्याही साइड इफेक्टविना शरीराला योग्य आकारात आणण्यासाठीही मदत होते.
मुंबई – आपल्या देशात दिवसागणिक मधुमेहींची संख्या वाढतच आहे. दरवर्षी १० ला....
अधिक वाचा