By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 10:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. पपईच्या सेवन एका वेळी किती प्रमाणात करावे हे देखील महत्त्वाचे आहे. कारण जास्त प्रमाणात पपई खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. पण पपई कोणत्या गोष्टींसोबत खाऊ नये हे पण जाणून घ्या.
पपई खाणे तुम्हाला आवडत असेल. पपई आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. पपईत अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात. तुम्ही देखील पपईचा आहारात समावेश करु शकता. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. जी अनेक प्रकारच्या रोग आणि संक्रमणांपासून वाचवते. इतके फायदे असले तरी देखील पपईचे सेवन कोणत्या फळासोबत करु नये हे देखील जाणून घ्या. कारण असे करणे धोक्याचे ठरु शकते. पपईसोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करु नये जाणून घ्या.
पपईसोबत कोणते फळ एकत्र खाऊ नये
लिंबू-पपई
पपई आणि लिंबू दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण या दोन्ही गोष्टी जर तुम्ही एकत्र खात असाल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. पपई सॅलड म्हणून खाल्ली आणि त्यात जर लिंबाचा रस घातला तर ते विषासारखे काम करू शकते. दोन्हीचे एकत्र सेवन केल्यास हिमोग्लोबिनची पातळी बिघडू शकते. यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
संत्री-पपई
संत्री हे देखील आंबट फळ आहे. ज्याचे पपई सोबत कधीच सेवन करु नये. पपई आणि संत्री एकत्र खालली तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे याचे सेवन करणे टाळावे.
केळी-पपई
केळी ही पौष्टिक फळांमध्ये येते. असं असलं तरी तुम्ही चुकूनही केळी आणि पपई यांचे एकत्र सेवन करु नये. दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो.
दूध-पपई
पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम आढळते. हे शरीरातील दुधाचे प्रथिने नष्ट करू शकते. त्यामुळे अपचन, सूज आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दुधासोबत पपई कधीच खाऊ नये.
पपईचे किती सेवन करावे
प्रत्येक गोष्ट प्रमाणात खालली तरच त्याचे चांगले फायदे होतात. अतिप्रमाणात खालले तर त्याचे दुष्परिणामत होऊ शकतात. तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पपई हवी असेल तर तुम्ही एक वाटी पपई किंवा 3 पातळ तुकडे पुरेसे असतात. यापेक्षा जास्त पपईचे सेवन हानिकारक देखील ठरु शकते.
पपईमध्ये एंजाइम पॅपेन असते ज्यामुळे ऍलर्जी असलेल्यांना सूज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, पुरळ उठणे यासारख्या ऍलर्जी होऊ शकतात.
नवीन वर्षानिमित्त लोक त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प ठरवत....
अधिक वाचा