ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन

शहर : मुंबई

रक्तातील सारखेची पातळी वाढू नये म्हणून आहाराची खूप काळजी घेतली पाहिजे. ब्लड शुगर वाढली तर त्यामुळे अनेक आजारांचा धोका असतो. अनेक अवयव निकामी होऊ शकतात. या शिवाय हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा देखील धोका वाढतो. त्यामुळे जर रक्तातील साखळी नियंत्रणात आणायची असेल तर ही हिरवी पाने मदत करु शकतील.

देशात आणि जगात प्रत्येक दुसरा व्यक्ती आता मधुमेहाने ग्रस्त आहे. महत्त्वाचे म्हणजे हा आजार फक्त आता मध्यमवयीन लोकांनाच नाही तर तरुणांमध्येही दिसत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. व्यायामाचा अभाव किंवा अनुवांशिक कारणांमुळेही मधुमेह होऊ शकतो. मधुमेह झाला की, लोकांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते तेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. मधुमेहामध्ये, रक्तातील साखर नियंत्रित करणे महत्वाचे असते. साखर वाढली तर आपल्यासाठी ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा स्थितीत तुळशी तुम्हाला मदत करु शकते. कारण तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीला आयुर्वेदात खूप महत्त्व देण्यात आले आहे.

तुळशीच्या पानांमध्ये हायपोग्लायसेमिक पातळी नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. तुळशीत शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करतात. ज्यामुळे अतिरिक्त साखरेचे प्रमाण काढून टाकण्यास ते मदत करतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर मूत्रपिंड निकामी होऊ शकते. याशिवाय हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, अवयव निकामी होणे असे वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. या शिवाय  डोळ्यांवर देखील त्याचे वाईट परिणाम होतात. रक्तातील साखर वाढली की त्यांची दृष्टी जाण्याची भीती असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढू नये म्हणून रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

तुळशीची काही पाने एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत. त्यानंतर हे पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिऊन घ्यावे. तुम्ही सकाळी तुळशीच्या पानांचा चहा देखील पिऊ शकता. यासाठी एक पाण्यात ते तुळशीची पाने टाका. मिनिटं पाणी गरम झाले की ते गाळून घ्या आणि त्यामझ्ये थोडे मध घालून ते पिऊन घ्या.

तुळशीचे इतर फायदे

तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य देखील सुधारते. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील ते मदत करते. तुळशीच्या सेवनाने तणाव देखीलल कमी होतो. तुळशीचा उष्टा प्यायल्याने सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

मागे

पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल
पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल

पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे आपली र....

अधिक वाचा

पुढे  

 कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या
कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या

कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळणारा एक महत्त्वाचा....

Read more