By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अहवालानुसार भारतामध्ये दर 20 वर्षात कर्करोग रुग्णांची संख्या दुप्पट होते. यापासून बचाव करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब केल्यास फायदा होईल.
वजनावर नियंत्रण
वाढलेले वजन व शरीरात जमा झालेली चरबी कर्करोगासाठी चालना देते. त्यामुळे आपले वजन संतुलित ठेवा, नियमितपणे व्यायाम करा. खासकरून महिलांमध्ये मेनोपॉजनंतर वजन वाढण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे आपल्या दिनचर्येमध्ये व्यायामाचा समावेश करा. तुम्हाला जड व्यायाम करायला आवडत नसेल तर तुम्ही दररोज अर्धा तास चालू शकता. वाटल्यास तुम्ही बागकाम किंवा स्विमिंग करूनही आपला फिटनेस कायम राखू शकता.
थेरपी करणे टाळा
ज्या महिला मेनोपॉजची लक्षणे कमी करण्यासाठी वारंवार हार्मोनल थेरपी करतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी किंवा पोस्ट मेनोपोजल थेरपी दीर्घ काळापर्यंत घेणे टाळले पाहिजे. यामुळे कर्करोगासाठी कारणीभूत असलेले अनेक साइड इफेक्ट होऊ शकतात. तसेच ब्लड क्लॉटिंग आणि स्ट्रोक किंवा डिमेन्शिया आदी समस्या होण्याचीही शक्यता असते.
प्रोसेस्ड फूड टाळा
आजकाल पाकीटबंद स्नॅक्स किंवा इतर खाण्याच्या पदार्थांमध्ये रंग व प्रिझर्व्हेटिव्जच्या रूपात अनेक रसायने मिसळले जातात. यापैकी काहींचा उल्लेख लेबलवर असतो आणि काहींचा नसतो. ही बहुतांश रसायने आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि कर्करोगासारख्या आजाराचे कारण बनतात. याशिवाय मटण खाण्याचे प्रमाणही कमीच असले पाहिजे. त्याऐवजी चिकन किंवा मासे खावेत.
1. भाज्या किंवा फळे कापल्यानंतर चाकू न धुता वापरला तर अन्न विषारी होते. त्याम....
अधिक वाचा