ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

या उपायांमुळे दूर होऊ शकतात दातांचे आजार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 01:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

या उपायांमुळे दूर होऊ शकतात दातांचे आजार

शहर : मुंबई

आईस्क्रीम खाताना दात ठणकतो आणि हात गालाकडे जातो. हे अनेकांनी अनुभवले असेल. तसेच थंड, गोड, गरम पदार्थ खाताना तुम्हालाही नक्कीच त्रास झाला असेल. दात सेन्सिटिव्ह झाल्यामुळे ही समस्या जाणवते. काही उपाय केले तर ही समस्या सुटू शकते.

> कोमट पाण्यात दोन चमचे मीठ मिसळा. दररोज सकाळी आणि रात्री या पाण्याने गुळण्या करा. दातदुखीपासून आराम मिळेल.

> ब्रश नेहमी योग्य पद्धतीने आणि हळू केला पाहिजे. जास्त वेळ ब्रश करू नये, यामुळे दात घासले जातात.

> दातांसोबत जीभदेखील स्वच्छ करावी. यामुळे तोंडाचा वास येत नाही. तुम्ही दात निरोगी ठेवण्यासाठी माउथवॉशदेखील वापरू शकता.

> दात घासण्यासाठी नेहमी मऊ टूथब्रश वापरा. यामुळे हिरड्यावर जास्त प्रेशर पडणार नाही. दात घासताना नेहमी हलक्या हाताने घासावे.

> फ्लोराइड असलेला माउथवाॅश किंवा टूथपेस्टचा वापर करावा. खरं तर, फ्लोराइड आपल्या दातांसाठी खूप चांगले असते. यामुळे दात सडत नाहीत.

> जंक फूड किंवा शीतपेय टाळले पाहिजे. शिवाय फळांचे रस, व्हिनेगर, रेड वाइन, चहा, आइस्क्रीम यासारख्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. या गोष्टींमुळे दाताचा मुलामा नाहिसा होतो. यामुळे दात पडायला लागतात.

मागे

हिवाळ्यात चिकू खाल्ल्याने होतील हे खास फायदे
हिवाळ्यात चिकू खाल्ल्याने होतील हे खास फायदे

हिवाळ्यात चिकूचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. कारण चिकू खाल्ल्या....

अधिक वाचा

पुढे  

गायत्री मंत्र जपाने दूर होतो मानसिक तणाव
गायत्री मंत्र जपाने दूर होतो मानसिक तणाव

एकाग्रता वाढवणे आणि मानसिक तणावापासून दूर राहण्याचा सर्वात चांगला आणि यशस....

Read more