By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 02:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
खाण्याशी संबंधित काही नियम घालून घेतल्यास आपले आरोग्य टिकवून ठेवणे सोपे जाते. इथे सांगत असलेल्या तीन नियमांचे पालन केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.
नियम 1. भरपूर प्रथिने घ्या
त्वचा, स्नायू, हाडे आणि केसांसाठी प्रथिने आवश्यक आहेत. स्नायू बळकट ठेवण्यामध्ये प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही प्रथिने महत्त्वाचे ठरतात. दररोज आपल्या आहारामध्ये अंडी, शेंगदाणे, राजमा, काबुली चणे आणि पनीर आदींचा समावेश करा. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतील.
नियम 2. वहीमध्ये लिहा
आपल्या आहाराशी संबंधित सवयी एका वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. एका आठवड्यात आपण जे खाल्ले ते यात लिहा. आठवडाभरानंतर ते वाचाल तेव्हा तुम्ही किती पौष्टिक पदार्थांचे सेवन केले, हे कळेल. तुम्ही आपल्या आहाराबाबत संभ्रमाच्या स्थितीत असाल तर एखाद्या आहार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही आपले आरोग्य टिकवून ठेवू शकता.
नियम 3. नवीन प्रयोग करा
पौष्टिक पदार्थांचा कंटाळा येऊ शकतो. अशा स्थितीचा सामना करण्यासाठी चविष्ट आणि भरपूर पोषक द्रव्ये असलेले नवीन पदार्थ खाण्याचा प्रयत्न करणे चांगले राहील. याचा शोध तुम्ही वृत्तपत्र, पदार्थांची पुस्तके आणि इंटरनेटच्या माध्यमातूनही घेऊ शकता. उदाहरणार्थ स्पेगेटी स्क्वॅश बनवण्याची रेसिपी शोधत असाल तर ते इंटरनेटच्या माध्यमातून शोधा आणि घरीच बनवून प्या.
एकाग्रता वाढवणे आणि मानसिक तणावापासून दूर राहण्याचा सर्वात चांगला आणि यशस....
अधिक वाचा