ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

थकवा का येतो हे माहीत आहे काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

थकवा का येतो हे माहीत आहे काय?

शहर : मुंबई

थोडेसे कष्टाचे काम करताच दम लागतो? पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो? वजनदार सामान उचलण्यास घाबरता? याचा अर्थ तुम्ही लवकर थकता. तज्ज्ञांच्या मते नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. कसे ते जाणून घ्या...

हृदयाशी संबंधित समस्या
शारीरिक थकवा आणि हृदयाशी संबंधित समस्या यांचा एकमेकांशी संबंध आहे. हृदयरोगाने पीडित असलेल्या लोकांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, त्यांच्यापैकी ७० टक्के लोकांनी नेहमी थकवा जाणवत असल्याबाबत दुजोरा दिला आहे. आर्टरीजमध्ये होणारा रक्तप्रवाह बाधित झाल्यामुळेही असे होऊ शकते.


थायरॉइडशी संबंधित समस्या 
३० ते ४५ वर्षांच्या मध्यम वयाच्या महिला पुरुषांना अनेक वेळा थायरॉइड ग्रंथींच्या सामान्यापेक्षा कमी सक्रियतेमुळेही अधिक थकवा जाणवू शकतो. या ग्रंथी गळ्यात असतात आणि टी टी हार्मोन सक्रिय करतात. यामध्ये कमतरता आल्याने वजन वाढणे, खूप थंडी वाजणे, मलावरोध, त्वचा रुक्ष होणे आणि केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

लिव्हरशी संबंधित समस्या 
जर हानिकारक व्हायरसमुळे लिव्हरला इजा पोहोचत असेल तर पीडितास नेहमी थकवा येऊ शकतो. लिव्हरची कार्यप्रणाली असामान्य होणे किंवा एखादा संसर्ग झाल्यावरच ही स्थिती निर्माण होते.

रक्ताची कमतरता 
जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. साधारणत: मासिक पाळी, गर्भावस्था आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांना ही समस्या झेलावी लागते. अशा वेळी अॅनिमिक होण्याची शक्यताही वाढते. याशिवाय मधुमेह असलेल्यांच्या शरीरात ब्लड शुगरच्या अनियमिततेमुळेही थकवा जाणवू शकतो.

मागे

किडनी निरोगी ठेवायची तर सकाळी अवश्य करा हे एक काम
किडनी निरोगी ठेवायची तर सकाळी अवश्य करा हे एक काम

आयुर्वेदात कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आपण रोज सकाळी एक ग्....

अधिक वाचा

पुढे  

उन्हाळा लागलाय...मग अद्रकाचा चहा पिणे थांबवा
उन्हाळा लागलाय...मग अद्रकाचा चहा पिणे थांबवा

हिवाळ्यात जे लोक अद्रकाचा चहा पितात, त्यांनी या ऋुतूमध्ये ही सवय बदलावयास प....

Read more