ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 47 लाख जणांना लाभ-डॉ. हर्ष वर्धन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 11:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 47 लाख जणांना लाभ-डॉ. हर्ष वर्धन

शहर : delhi

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी सुमारे 47 लाख व्यक्तींना उपचार उपलब्ध होऊ शकले आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 21 हजारांहून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली.

योजनांबाबत अधिक जागृती करण्यासाठी आयुष्मान भारत पंधरवड्याची घोषणा करताना ते बोलत होते. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या वर्षपूर्तीबद्दल 15 ते 30 सप्टेंबर हा पंधरवडा आयुष्मान भारत पंधरवडा साजरा होत आहे.

14 एप्रिल 2018 रोजी आयुष्मान योजनेचा तर 23 सप्टेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या प्रारंभ झाला.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना :

  • या योजनेमुळे देशातील गरीब आणि कमजोर वर्गाला वैद्यकीय आरोग्याच्या बाबतीतील जबरदस्त आर्थिक बोजा सहन करावा लागतो तो ह्यायोजनेमुळे मदत उपलब्ध केली जाते.
  • या योजनेंतर्गत येणार्‍या प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांचा आरोग्य विमा दिला जातो. ज्यात हॉस्पिटलायझेशन आधी आणि नंतर खर्च देखील समाविष्ट आहे.या योजनेत रुग्णालयात जाण्यापूर्वी, त्यापूर्वीच्या आरोग्याशी संबंधीत खर्ची आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याच्या नंतर त्यापैकी खर्चाचाही समावेश होतो.
  • वीमा कव्हर पासून आपण लहान आणि वृद्धांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. मुली, महिला आणि वरिष्ठ नागरिकांना प्राथमिकता दिले जाते. केंद्र सरकार 60 टक्के, राज्य सरकार 40 टक्के खर्च उचलते. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च ही दिला जातो.
  • अगोदर पासून असलेल्या जुन्या आजारावरी ह्या योजनेचा फायदा घेता येतो. रुग्णाला उपचारापासून रोखता येत नाही.
  • लाभार्थी 24*7 हेल्पलाइन नंबर -14555 वर काही माहिती प्राप्त करुन घेऊ शकतात , मदत मिळवू शकतात

मागे

राज्यात रुग्ण शोध विशेष अभियान सुरु 8 कोटी 66 लाख लोकांचे होणार सर्वेक्षण - आरोग्यमंत्री   
राज्यात रुग्ण शोध विशेष अभियान सुरु 8 कोटी 66 लाख लोकांचे होणार सर्वेक्षण - आरोग्यमंत्री  

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यात  कुष्ठरोग....

अधिक वाचा

पुढे  

इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशात आरोग्यासाठी प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते....

Read more