By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिंक किंवा खोकला आल्यावर कधी-कधी नकळत लघवी होते. त्यामुळे कपडे आणि घरातून बाहेर असल्यास अशा वेळी परिस्थिती निर्माण होते. संपूर्ण जगात 3 महिलांपैकी 1 तरी या त्रासाला सामोरा जावं लागतं. या त्रासाला "यूरिनरी इनकॉन्टिनेंस" (मूत्रावरचे अनियंत्रण) असे म्हटले जाते. हा आजार पुरुषांमध्ये ही आढळतो पण त्यांचा दर स्त्रियांच्या तुलनेत कमी आहे. पुरुषांमध्ये 8 पैकी एकाला अशी समस्या असू शकते.
मूत्रमार्गाचे अनियंत्रण म्हणजे माणसाची इच्छा नसूनही शरीरातून लघवी स्वतःच बाहेर पडणे. आपले मूत्र मूत्राशयात साठवले जातात. ज्यावेळी मूत्राशय भरायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला लघवी येते. काही जण लघवी आल्यावरही जात नाही आणि लघवी थांबवतात. अशात स्नायू कमकुवत झाल्यास अनियंत्रणाचा त्रास उद्भवतो. अश्या परिस्थितीत शिंक किंवा खोकला आल्यावर लघवी होऊन जाते.
कारणे-
स्नायूंचा कमकुवतपणा
महिलांमध्ये सरत्या वयानुसार हा आजार होऊ शकतो. साधारणपणे वयाच्या 30 ते 35 वर्षानंतर हा त्रास उद्भवतो.काही महिलांमध्ये वृद्धत्वानुसार हा आजार संभवतो.बाळास जन्म दिल्यावर अनेक स्त्रियांच्या खालील शरीराच्या स्नायू कमकुवत होतात. कारण बाळाच्या जन्माच्या वेळीस हे स्नायू जास्त ताणले जातात. जेव्हा आई कमजोर आणि मूळ सशक्त असल्यास असे होणे अधिक संभवते. या शिवाय स्थूलपणा, मधुमेह असल्यास हा त्रास संभवतो.अत्यधिक कॉफीचे सेवन केल्यास.धूम्रपानाची सवय असल्यास.
उपचार-
हा आजार दीर्घकाळापासून असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे नितांत आवश्यक आहे. मूत्राशयाच्या व्यायामांपासून ते ऑपरेशनपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहे.डॉक्टर रुग्णाला जीवनशैलीत सुधारण्याचा सल्ला देतात. धूम्रपान न करणे आणि जास्त कॉफी न पिण्याचा सल्ला दिला जातो.स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम शिकवले जातात. यांना पेल्विक फ्लोर स्नायूंचे प्रशिक्षण व्यायाम असे म्हणतात.मूत्राशयाचे प्रशिक्षण दिले जाते. ह्यात जास्त जोरात लघवी आल्यास काय करणे. तसेच प्रशिक्षण देऊन लघवी कशी थांबवून ठेवू शकतो शिकवणी दिली जाते.या सर्व उपचारामुळे हा त्रास दूर केला जातो. नाहीतर औषधे देण्यात येतात. तरी परिणाम हाती येत नसल्यास शल्यचिकित्सा केली जाते.
तरी या आजाराबद्दल महिला जागरूक नाहीत. बऱ्याच स्त्रिया हे सामान्य लक्षण असल्याचा विचार करून डॉक्टरांकडे जात नाही. पण वेळीच ह्याचे निदान न केल्यास हा आजार गंभीर होऊ शकतो. यासाठी गरज आहे की स्त्रियांनी लाज न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावर उचित औषधोपचार करावं. हा एक सामान्य आजार असून उपचार करणे देखील सोपे आहे. परंतू दुर्लक्ष केल्याने समस्या मोठं रूप धारण करू शकते.
खाण्याशी संबंधित काही नियम घालून घेतल्यास आपले आरोग्य टिकवून ठेवणे सोपे जा....
अधिक वाचा