ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हे आजार टाळण्यासाठी शाकाहारी लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 02:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हे आजार टाळण्यासाठी शाकाहारी लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे?

शहर : मुंबई

कॅरोलाईन पार्किंसन

व्हिगन आणि शाकाहारी जेवणामुळे हृदयरोगाचा धोका कमी होत असला तरी यामुळे स्ट्रोकचा म्हणजेच लकव्याचा धोका वाढत असल्याचं नुकतंच एका संशोधनात आढळलंय.

18 वर्षांच्या कालावधीमध्ये 48,000 लोकांचा अभ्यास करून करण्यात आलेलं हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालंय.

व्हिगन, शाकाहारी आणि मांसाहारी अशा तीन गटांच्या प्रत्येकी हजार लोकांची पाहणी केली असता व्हिगन आणि शाकाहारी गटांमध्ये हृदयाच्या धमन्यांशी निगडीत रोगांचं प्रमाण 10% कमी आढळलं. पण या गटात अर्धांगवायूचं प्रमाण तीन टक्क्यांनी अधिक होतं.

लोक शाकाहारी असोत वा मांसाहारी त्यांनी आरोग्यासाठी चांगले विविध प्रकारचे पदार्थ खायला हवेत असं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हा अभ्यास काय सांगतो?

यामध्ये ईपीआयसी-ऑक्सफर्डच्या आकडेवारीचं यामध्ये विश्लेषण करण्यात आलंय. ईपीआयसी-ऑक्सफर्ड हा एक महत्त्वाचा आहार आणि आरोग्य विषयक प्रकल्प आहे.

या पाहणीमध्ये सामील झालेल्यांपैकी अर्धे लोक मांसाहारी होते. 1993 ते 2001च्या दरम्यान त्यांना या पाहणीत सामील करण्यात आलं. एकूण 16 हजार लोक व्हिगन आणि शाकाहारी होते.

व्हिगन आहारामध्ये कोणत्याही प्राणीजन्य पदार्थांचा म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश नसतो.7,500 लोकांनी पेसेटेरियन (Pescetarian) असल्याचं सांगितलं. म्हणजे हे लोकं मासे खातात पण मांस खात नाहीत.

या सगळ्यांकडून सुरुवातीला त्यांच्या आहाराविषयीची माहिती घेण्यात आली. 2010मध्ये पुन्हा एकदा ही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.पण फक्त आहारच नाही तर या काळात त्यांची तब्येत कशी होती, धूम्रपान आणि इतर शारीरिक घडामोडी आणि बदलांविषयीची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.

हृदयाच्या धमन्याशी निगडीत (Coronary Heart Disease) एकूण 2820 प्रकरणं आढळली. तर स्ट्रोक म्हणजे लकवा वा अर्धांगवायूच्या 1072 घटना आढळल्या. यामध्ये ब्रेन हॅमरेज (मेंदूमधील नस फाटणं)च्या 300 घटनांचाही समावेश होता.

मांसाहारी लोकांच्या तुलनेत मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयाच्या धमन्यांशी निगडीत रोगांचा धोका 13%ने कमी होता. तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांमध्ये हा धोका 22% कमी होता.

पण शाकाहारी लोकांना अर्धांगवायूचा धोका 20% जास्त असल्याचं आढळलं. व्हिटामिन बी-12 च्या कमतरता हे यामागचं कारण असू शकतं असं संशोधकांचं म्हणणं आहे. पण यावर अजून संशोधन होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

अशी ही शक्यता आहे की एखाद्या व्यक्तीचा आहार आणि रोग होण्याचा धोका यामध्ये संबंध नसेल आणि हा कदाचित मांस खाणाऱ्या लोकांच्या जगण्याच्या पद्धतींतला फरक असेल.

व्हिगन आणि शाकाहारी असणं चूक आहे का?

याचं उत्तर 'नाही' असल्याचं ब्रिटिश डाएटेटिक असोसिएशनच्या डॉ. फ्रँकी फिलिप्स म्हणतात. कारण हे एक असं संशोधन होतं जिथे लोकांवर फक्त लक्ष ठेवण्यात आलं होतं.

त्या म्हणतात, "त्यांनी लोकांच्या खाण्याच्या सवयींचा अनेक वर्षं अभ्यास केला म्हणून हे एक कारण असू शकतं. पण हे त्यामागचं एकमेव कारण नाही."

"लोकांनी योग्य आखणी करून चांगला आहार घ्यावा आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचं सेवन करावं. पण मांसाहारी लोकांनी असं करण्याची गरज नाही. कारण ते भाज्या खाताही मांस आणि बटाटे खाऊन जगू शकतात."

लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या का?

या संशोधनामध्ये सामील झालेल्या लोकांशी संशोधकांनी पुन्हा संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या आहाराबद्दल विचारलं.पण व्हिगन आणि शाकाहारी लोकांच्या आहारात बदल झाला असावा असं डॉ. फिलिप्स यांचं म्हणणं आहे.त्या म्हणतात, "हा डेटा काही दशकांपूर्वी गोळा करण्यात आला होता. आजचं शाकाहारी जेवण हे 20 वा 30 वर्षांपूर्वीच्या शाकाहारी जेवणापेक्षा आणि व्हिगन जेवणापेक्षा खूप वेगळं असू शकतं."

"व्हिगन आणि शाकाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे."

प्रोसेस्ड फूड म्हणजेच प्रक्रिया करण्यात आलेलं अन्न आणि रेड मीट म्हणजे लाल मांस खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.

आपल्या पानात काय असायला हवं?

शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी संतुलित आहार नेमका कसा असावा हे ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या 'इटवेल गाईड'मध्ये सांगण्यात आलंय.

दिवसातून किमान पाच प्रकारची फळं आणि भाज्या खाव्यात बटाटा, चपाती, भात आणि पास्तासारख्या जास्त फायबर आणि स्टार्ट असणाऱ्या पदार्थांचं सेवन करावं.

विसरता प्रथिनांचं - प्रोटीन्सचं सेवन करावं. कमी फॅट्स असणारं मांस, मासे, डाळी, सोयाबिन आणि बदाम खावेत.डेअरी किंवा त्यासाठीच्या पर्यायी पदार्थांचा आवर्जून समावेश करावा.

अधिक फॅट्स असणारे पदार्थ, साखर आणि मिठाचं सेवन कमी प्रमाणात करावं.पण व्हिगन आणि शाकाहारी लोकांना अतिरिक्त पोषकत्त्वांची गरज असते.

उदाहरणार्थ जे लोक मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि मासे खातात त्यांच्या शरीरात सहसा व्हिटॅमिन बी - 12ची कमतरता आढळत नाही. हे आरोग्य, रक्त आणि नर्व्हस सिस्टीमसाठी गरजेचं असतं.

पण व्हिगन आहार करणाऱ्यांमध्ये याची कमतरता आढळू शकते. पण बी-12 मिळण्यासाठी अशा व्यक्ती जाड्या धान्याचे वा भरडीचे पदार्थ खाऊ शकतात.

ज्यांना मांस खायला आवडत नाही त्यांनी पूर्णपणे धान्य वापरून केलेली भाकरी वा चपाती, सुकामेवा आणि डाळ खाणं गरजेचं आहे.

 

 

मागे

सावधान! अॅसिडिटीच्या ‘या’ औषधामुळे होईल कॅन्सर
सावधान! अॅसिडिटीच्या ‘या’ औषधामुळे होईल कॅन्सर

तुम्ही अॅसिडिटी झाल्यास कोणती गोळी घेता? प्रसिद्ध रेनिटिडाइन औषध तर घेत ना....

अधिक वाचा

पुढे  

छातीत जळजळ होत असल्यास चुकूनही करू नका या संकेतांकडे दुलर्क्ष
छातीत जळजळ होत असल्यास चुकूनही करू नका या संकेतांकडे दुलर्क्ष

छातीत जळजळ होत असेल तर व्हा सावधान! होऊ शकते ही गंभीर समस्या गॅस्ट्रोएसोफेग....

Read more