ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

योगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

योगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या!

शहर : मुंबई

योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल. > कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

 सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.

रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे. अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते.

योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.

लक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणार्यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

मागे

आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे
आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे

21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येईल. ज्याची ....

अधिक वाचा

पुढे  

गर्भनिरोधक गोळ्या घेताय? सावधान
गर्भनिरोधक गोळ्या घेताय? सावधान

गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा उपयोग करत असाल तर सावधान. या गो....

Read more