ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पिकलेल प्रेम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 07:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पिकलेल प्रेम

शहर : मुंबई

कधीही सगळयानसमोर आजीचा हाथ हाथात घेतलेले आजोबा ,आजीच्या हाथदुखीच आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे वाजल्या पासून वाटतात,आणि आजी उठल्या उठल्या "यांना" चहा लागतो अस म्हणत दुखरया हाथानेच चहा टाकते.आबांनी जेवणात लोणच मागितल की डॉक्टर आजी B.P च्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबांच्या आवडीच गोडलिबांचच लोणच घालते

एरवी दोनच पोळ्या खाणारे आबा "भाजी चांगली झाली आहे" हे सांगता "आणि एक पोळी वाढ " म्हणून पसंतीची पोचपावती देतात आन फुगलेली पोळी वाढताना आजी हळूच लाजते.बाहेरून येताना पालकाच्या जुडीखाली एक मोगरयाची माळ लपलेली असते, अन " केस कुठे उरलेत आता" अस म्हणत त्या विरळ झालेल्या आंबाड्याच वजन, आजी पांढरी माळ 'गुलाबी' होत मळून, वाढवत असते.

आजीने पहिल्यांदा दिलेल्या क्यासेट मधली गाणी बा आजही चोरून ऐकतात, अन आबांनी आजी ला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालुतुन डोकावताना दिसतआजही आजोबांचे मित्र आले की आजी आत जाते आणि सांगता भजीची बशी सगळ्यांसमोर येते.भाजी आणायला जेंव्हा आजी आजोबा बागेजवळच्या मंडइत जातात येताना कधी कधी मातीचे छपे धोतरावर घेऊन येतात.

भांडण झाल दोघांच्यात की घरी दुधीची भाजी बनते, पण आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरांब्याची बरणी आणायला पळवते.कधीतरी आबा मुद्दामून मला मधुबालाच्या सौंदर्याच्या कथा सांगतात अन तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात, मग आजीपण खट्याळ हसते आणि कपाटातुन राजेशखनाच्या फोटो वरची धूळ पुसते

दिवाळीला ओवाळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकच कौतूक असत आणि त्या डोळ्यांकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत आबा पण ताठ बसतातआजी आजारी पडली की मात्र आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबांकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजतेआजारपणमात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही, मग ती झोपली की आजोबा हळूच तिचे पाय चेपतता अन आजीच्या बंद डोळ्यातून आश्रू घरंगळत उशीला भेटतात

पिकलेल्या लोणच्याला आता बरणीपासून दुरावा सहन होत नाहीअन बरणीला पण लोणच्याशिवाय आता करमत नाही...

मागे

संघटितपणाचे महत्त्व
संघटितपणाचे महत्त्व

एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आ¸ष्यात चांगली कमाईकरून आणि स्व....

अधिक वाचा

पुढे  

जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रभावी आणि अडचणींतून दिलासा देणारे सूत्र
जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रभावी आणि अडचणींतून दिलासा देणारे सूत्र

अडचणी तर प्रत्येकाच्या जीवनात असतात. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक म....

Read more