By
DAYANAND MOHITE | प्रकाशित:
ऑगस्ट 07, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कृष्ण जेवत होते. दोन घास खाल्ले आणि ताट बाजूला सारून ते दरवाजाकडे गेले. रुक्मिणी म्हणाली, असं भरल्या ताटावरून कुणी उठतं का? काहीही उत्तर न देता कृष्ण दरवाजापर्यंत गेले आणि परत येऊन जेवू लागले. रुक्मिणीने विचारताच ते म्हणाले, माझा आवडता भक्त रस्त्यातून जात होता. काही लोक त्याला दगड मारीत होते. रक्ताळलेल्या अवस्थेतही तो हसत होता. त्याला माझी गरज होती, म्हणून उठलो होतो. रुक्मिणी म्हणाली, मग परत का आलात? कृष्ण म्हणाला, दरवाजाजवळ गेलो तेव्हा त्याला माझी गरज राहिली नव्हती. त्या भक्ताने स्वत:च दगड घेऊन प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली होती. जोपर्यंत तो निराधार होता तोपर्यंत त्याचे प्राण मला चुंबकाप्रमाणे खेचून घेत होते. आता तो निराधार नाही. त्याला दगडाचा आधार आहे. त्याच्याजवळ ताकद आहे. तो लढतो आहे. अशावेळी त्याला माझा आधार देऊन निर्बल बनविणे योग्य नाही.
कथा उपदेश -: आपले हात-मन भरलेले आहे, तोपर्यंत परमात्म्याचा आधार नाही. जेव्हा त्याचा आधार लाभतो, तेव्हा माणूस संपूर्ण निराधार होतो. निर्बल आणि दुर्बल होतो.