ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लाभ होवो किंवा नुकसान, प्रसन्न राहावे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लाभ होवो किंवा नुकसान, प्रसन्न राहावे

शहर : मुंबई

एका साधूने भिकाऱ्याला दानामध्ये एक ग्लास दिला, नंतर साधूच्या पत्नीने सांगिलते, तो चांदीचा ग्लास होता, पुढे काय झाले एका गावातील भिकाऱ्याने एका संतांच्या घराचा दरवाजा ठोठावला. संतांनी दरवाजा उघडला आणि भिकाऱ्याला पाहून काहीतरी आणण्यासाठी घरात गेले. घरामध्ये भिकाऱ्याला देण्यासाठी खाण्याची कोणतीच गोष्ट नव्हती. तेव्हा संताने घरातील एक भांडे उचलून भिकाऱ्याला दिले.

 

  • भांडे घेऊन भिकारी पुढे निघून गेला. ही गोष्ट संतांच्या पत्नीला समजल्यानंतर ती संतांवर ओरडून म्हणाली, हे काय केले...ते भांडे चांदीचे होते. हे ऐकून संत धावत त्या भिकाऱ्याजवळ गेले आणि म्हणाले भाऊ हा ग्लास चांदीचा आहे, कमी किंमतीमध्ये विकू नकोस.

 

  • काही वेळाने संत रिकाम्या हाताने घरी परतले परंतु ते प्रसन्न दिसत होते. पत्नी म्हणाली भांडे घेऊन तर परत आला नाहीत मग एवढे प्रसन्न का आहात?

 

  • संत म्हणाले- मी या गोष्टीचा अभ्यास करत आहे की आपण कितीही मोठे नुकसान झाले तरी दुःखी आणि निराश होऊ नये. मी नकळतपणे त्या भिकाऱ्याला मौल्यवान वस्तू दिली परंतु दिलेले दान परत घेऊ शकत नाही आणि यामुळे नुकसान झाले परंतु मी दुःखी नाही. आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रसन्न राहावे.

 

कथेची शिकवण -: या छोट्याशा कथेची शिकवण अशी आहे की व्यक्तीने लाभ किंवा नुकसान झाले तरी प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रसन्न राहावे. नुकसान झाल्यानंतर दुःखी आणि निराश होऊ नये.

मागे

लाभ होवो किंवा नुकसान, प्रसन्न राहावे
लाभ होवो किंवा नुकसान, प्रसन्न राहावे

एका साधूने भिकाऱ्याला दानामध्ये एक ग्लास दिला, नंतर साधूच्या पत्नीने सांगि....

अधिक वाचा

पुढे  

जे मिळते त्यातच समाधान मानायला शिका
जे मिळते त्यातच समाधान मानायला शिका

एका गरीब शेतकऱ्याने गावातील जमीनदाराच्या शेतात द्राक्ष वेल लावली. तो दररोज....

Read more