ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो……..

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 07:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो……..

शहर : मुंबई

सर्वांच्या आयुष्यात मित्राचे महत्त्व जास्त असते. हे एक असे नाते असते ज्याची आपण स्वतः निवड करतो. आपणच ठरवतो की आपला मित्र कोण असेल. आचार्य चाणक्यांनी मित्रांशी संबंधित एक नीती सांगितली आह. या नितीकडे आपण विशेष लक्ष दिल्यास विविध अडचणींपासून दूर राहू शकतो.

चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकामध्ये लिहिले आहे की...

परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्ष प्रियवादिनम्।

वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुंभम् पयोमुखम्।।

अर्थ -: या नितीमध्ये चाणक्य सांगतात की, जो मित्र आपल्यासमोर गॉड बोलतो, आपले कौतुक करतो आणि पाठीमागे निंदा करतो, काम बिघडवण्याचा प्रयत्न करतो अशा लोकांसोबत मैत्री ठेवू नये. अशा मित्रांचा लगेच त्याग करावा. असे मित्र अशा मठाप्रमाणे असतात ज्याच्या मुखावर दूध दिसते परंतु आतून विष भरलेले असते. यांची मैत्री आपल्यासाठी नुकसानदायक असते. यामुळे अशा मित्रांपासून दूर राहावे.

चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकानुसार

विश्वसेत् कुमित्रे मित्रे चाऽपि विश्वसेत्।

कदाचित् कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत्।।

अर्थ -: या नितीमध्ये चाणक्य सांगतात की, कुमित्रावर आजिबात विश्वास ठेवू नये. यासोबतच ही गोष्टही लक्षात ठेवावी की, सुमित्रावरही संपूर्ण विश्वास ठेवू नये. भविष्यात त्याच्यासोबत आपला वाद झाला तर आपले सर्व रहस्य तो उघड करू शकतो.

 

मागे

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला

एका कॉलेजमध्ये फिलॉसफीचे एक प्रोफेसर शिकवायचे. ते वेगवेगळ्या पध्दतींनी वि....

अधिक वाचा

पुढे  

पेला होण्यापेक्षा तळं व्हावे
पेला होण्यापेक्षा तळं व्हावे

एकदा अनुभवी आणि वृद्ध गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते.....

Read more