By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 10:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जात आहे. पंडित नेहरू लहान मुलांमध्ये रामायचे आणि यांचा लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे तरच भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील, या विचारांचे पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या, त्यामुळे बाल दिनाच्या निमित्ताने मुलांचा कला गुणांचा वाव देणार्या कार्यक्रमांच केला जावं, अस ठरविण्यात आलं. परिणामी १४ नोव्हेंबरला देशभरातील अनेक शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
तसं पाहिलं तर जगभरात १९२५ पासून बाल दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. विविध देशात बाल दिन वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्यात येतो. भारतात पंडित नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबरला बाल दिन साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
अस जरी असल तरी भारतात सुमारे १८ दशलक्ष मुले रस्त्यावर राहत असल्याचे आढळून आले आहे. बाल दिनांनिमित्त देशातील बालकांची स्थिति जाणून घेतली तर ती निश्चित भूषणावह काही, हे दिसून येईल. बाल दिन दरवर्षी मुलांच्या समस्याकडे लक्ष्य वेधले जाते. पण पुढे त्यावर काही कारवाई होत नाही. त्यामुळे कोट्यावधी मुलांचे भवितव्य अंधारातच सापडल्याचे जाणवते.
आपल्या देशात रस्त्यावर राहणारी मुले ही ५ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. ही मुले पडक्या इमारती, पुठ्यांची खोकी, बागा किवा पदपथावर झोपतात. त्यांची विशिष्ट वर्गवारी काही, जी मुले रस्त्यावर राहतात त्यांच्याकडे बघणारे मोठे कोणीच नसते. अशी बहुसंख्य मुले गुन्हेगारी प्रवृतीची होतात. रस्त्यावर राहणारी काही मुले भीक मागतात तर विविध वस्तु विकतात. घराची बिकट आर्थिक स्थिति पाहता अनेक मुले कायम रस्तावर जगणे पसंत करतात.
आपल्या १३० कोटी लोकसंखेत सुमारे ४० कोटी मुले-मुलीच आहेत. यातील २६ टक्के लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली आहे. बालश्रमातील मुलांचेही लेंगिक शोषण केल्याची काही प्रकरणेही उघडकीस आली. कोट्यावधी मुले मोलमजुरी करतात. तर लक्षावधी मुले दहविकयात गुंतल्याचे म्हंटले जाते.
रस्तावर राहणार्या मूला-मुलींना रस्ता हेच आपले खरे घर वाटू लागते. तिथल्या परिसस्थितीत त्यानं कोणती ही संरक्षण नसते. त्यांचावर कोणतीही देखरेख नसते. त्यांना देणारी कोणी जवाबदार प्रौढ व्यक्ती नसते. यातील बरीचशी मुले मुली गुहनेगारी वेश्या व्यवसाय टोळ्या बनवून चोर्यामार्या करणे, मादक द्रव्यांचा वाहतुकीत गुंतल्याचे दिसून येते.
खरे रस्त्यावरील मुलांसाठी काही स्वयंसेवी संस्था कार्य करीत आहेत. परतू रस्त्यावरील मुलांची संख्याच प्रचंड आहे. अशी स्थितीत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी या मुलांसाठी खास योजना सुरू करण्याची खरी गरज आहे. पाश्रचात्य राष्ट्रात मुलांची सर्व जवाबदारी घेण्यात येतात. मुलं ही राष्ट्रीय संपत्ति मानून त्याची जडणघडण करण्यात येते. काही देशांमध्ये लहानपणीच मुलांमधील कोंशल्य जाणून घेऊन त्यांना त्या त्या पद्धतीने शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांना घडविण्यात येते. असे काही उपक्रम आपल्या देशात स्वंयंसेवी संस्थाच्या माध्यमातून राबविण्याची गरज आहे. कारण कित्येक मुलांचे बालपणच कामेजून गेल्याचे जाणवते. ‘रम्य ते बालपण देई देवा फिरून‘ असे बालपणच कोमजलेले मुले कसे म्हणतील. ‘मुले म्हणजे देवाघरची फुले,’ असे म्हणतात. पण आज जीवगेना जागतिक स्पर्धेत मुलांना मोकळा श्र्वासुद्धा घेता येते. काही हे वास्तव्य आहे. स्वछ्न्द बागडणारी मुलं कुठं दिसतात का? ती शोधावी लागतात. त्यांचातील निरागसता बाल्य सगळंच कापलेल जाणवतं. ही स्थिति जेव्हा बदलेल, तेव्हाच खर्या अर्थाने बाल दिन साजरा करण्याचे श्रम सार्थकी लागतील!
लोककथेनुसार प्राचीन काळी एका राजाच्या राज्यात दुष्काळ पडला. यामुळे त्याला ....
अधिक वाचा