ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अहंकारामुळे सुखी जीवनात अडचणी वाढतात

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अहंकारामुळे सुखी जीवनात अडचणी वाढतात

शहर : मुंबई

पुरातन कथेनुसार एक राजा खूप धार्मिक आणि संस्कारी होता. त्याच्या वाढदिवसादिवशी कोणत्याही एका व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले. राज्यातील प्रजा राजाला शुभेच्छा देण्यासाठी राजमहालात दाखल झाली. प्रजेसोबत एक साधू देखील राजाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. साधूची भेट घेऊन राजा प्रसन्न झाला. राजा साधूला म्हणाला - गुरुदेव आज मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्हाला जे मागायचे आहे ते मागा. मी तुमची सर्व इच्छा पूर्ण करेन.

यावर साधू राजाला म्हणाले - मी तर वैरागी आहे. मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. तुम्हाला जर मला काही द्यायचे असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही देऊ शकता.

  • आता राजा विचारात पडला की, साधूंना काय द्यावे. राजा म्हणाला, मी तुम्हाला एक गाव देतो. यावर संत म्हणाले - नाही महाराज, गाव तर राहणाऱ्या लोकांचे आहे. तुम्ही फक्त त्या गावाचे रक्षक आहात. मग राजा म्हणाला तुम्ही माझा महाल घ्या. साधू म्हणाले - हा महाल देखील तुमच्या राज्याचा आहे. तुम्ही या ठिकाणाहून प्रजेसाठी काम करतात. ही प्रजेची संपत्ती आहे.
  • राजा खूप विचार म्हणाला की, तुम्ही मला तुमचा सेवक बनवा. मी स्वतःला समर्प्रित करतो. साधू म्हणाले - नाही महाराज, तुमच्यावर तर तुमची पत्नी आणि मुलांचा अधिकार आहे. मी तुम्हाला माझा सेवक नाही बनवू शकत.
  •  साधूचे हे बोलणे राजा परेशान झाला. तो म्हणाला की आता तुम्हीच सांगी मी तुम्हाला काय देऊ? साधू म्हणाले - राजन तुम्ही मला तुमचा अहंकार द्या. अहंकाराचा त्याग करा. कारण ही एकच वाईट वृत्ती माणून सहजरित्या सोडत नाही. अहंकारामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येतात. रावण, कंस आणि दुर्योधन यांचा देखील अहंकारामुळेच मृत्यू झाला.

साधूचे बोलणे ऐकून राजाने अहंकाराचा त्याग करण्याचा संकल्प केला.

मागे

गुरु दक्षिणा
गुरु दक्षिणा

फार पूर्वी ‘भागवनगर’ नावाचे एक छोटे खेडे होते. या खेड्यात एक झोपडीत एक गर....

अधिक वाचा

पुढे  

लाभ होवो किंवा नुकसान, प्रसन्न राहावे
लाभ होवो किंवा नुकसान, प्रसन्न राहावे

एका साधूने भिकाऱ्याला दानामध्ये एक ग्लास दिला, नंतर साधूच्या पत्नीने सांगि....

Read more