By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 08:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एक इट नावाचे खेडे होते. त्या खेड्यात सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत असे. त्या खेड्यातला सरपंच देखील खूप प्रेमळ होता कोणत्याही समस्या असल्यातरी तो चित्ताने सोडावीत असे त्यामुळे सर्व गावकरी त्याच्यावर खूश होते.
गावाबाहेर एक विहीर होती. गावातल्या बायका त्या विहिरीवर रोज पाणी भरण्यासाठी येत असे. एकदा काय झाले एका कावळ्याला लागली तहान. तो उडत उडत विहिरीजवळ आला. तेथे बायका पाणी भरत होत्या त्यांनी हंडा भरून डोक्यावर घेतला की त्या कावळ्याने हंड्यातील पाणी पिले. आता त्या कावळ्याने हंड्यातील पाणी पिले. आता त्या कावळ्याला सवयच लागून गेली. बायकांनी हंडा घासून धुऊन पाणी भरून डोक्यावर घेतला की तो कावळा येत असे आणि हंड्यातील पाणी पीत असे. काव काव करीत झाडावर बसत असे. परत त्या बायका ते पाणी फेकून देत असे शेवटी बायका कंटाळल्या कारण त्या कावळ्याला अजून पोटभर पाणी प्यायलाच मिळालेच नव्हते. मग त्या बायका रागावल्या आणि म्हणाल्या चला गं आपण सर्वजणी सरपंचाकडेच जाऊ, हा कावळा आम्हाला रोज त्रास देतो.
मग त्या सर्व बायका सरपंचाकडे गेल्या. नोकराने विचारले 'बायांनो काय काम आहे? बायकांनी सांगितले. त्या कावळ्याबद्दल आमची तक्रार आहे. नोकराने सरपंचाकडे नेले. सरपंच म्हणाला काय गं बायांनो, काय काम आहे? बायकांनी सांगितले, 'आव विहिरीवर एक कावळा आलाय. तो आम्हाला खूप त्रास देतोय. आमचे पाणी उष्टे करतोय, त्याला काही शिक्षा करा. मग सरपंचाने नोकराला हाक मारली आणि म्हणाले जा त्या कावळ्याला पकडून आणा!
मग नोकर गेला कावळ्याला पकडायला. का रे कावळ्या, तूच बायकांचे पाणी उष्टे करतोय का? असे विचारले असता काव काव करीत कावळ्याने मान डोलविली. नोकराने त्या कावळ्याला पकडून सरपंचासमोर हजर केले. तोच प्रश्न त्या सरपंचाने कावळ्याला विचारले तेव्हा काव काव करीत कावळ्याने मान डोलविली. सरपंच म्हणाला ह्याला त्या चिखलात टाकून या. त्या नोकराने कावळ्याला चिखलात टाकून दिले तर कावळा गाणे म्हणू लागला. ''चिखलात घसरगुंडी करू या बाबा, चिखलात घसरगुंडी करू या'' गाणे म्हणत म्हणच त्याची घसरगुंडी चालली होती. मग सरपंचाने त्याला काट्यात टाकण्यास सांगितले. पण तेथे पण हा आनंदी कावळा गाणे म्हणू लागला. काट्याने कान टोचू या बाबा काट्याने कान टोचू या! सरपंच खूप रागावले अणी म्हणाला ह्या तेलाच्या डब्यात कावळ्याला द्या टाकून. नोकराने त्याला डब्यात टाकले तसा कावळा म्हणू लागला. ''कानात तेल घालू या बाबा कानात तेल घालू या. '' हे ऐकल्यावर सरपंच थक्क झाले. नंतर म्हणाले त्याला त्या गुळाच्या डब्यात टाका. नोकराने कावळ्याला गुळाच्या डब्यात टाकले. कावळा म्हणू लागला, ''गुळाचे खडे खाऊ या बाबा, गुळाचे खडे खाऊ या. '' हे ऐकल्यावर सरपंचाला हसू आले आणि जा त्या कावळ्याला इकडे घेऊन या. '' नोकराने कावळ्याला सरपंचासमोर आणले. ते म्हणाले, ''का रे कावळ्या तुला चिखलात टाकले, काट्यात टाकले, गुळात टाकले तू रडला नाहीस. कावळा काव काव असे म्हणाला. सरपंच म्हणाले मला तू फारच आवडलास. मी स्वखुशीने एक पाण्याच हौद बांधून देतो. त्या हौदातले पाणी तू पीत जा. मग तर त्या बायकांचे पाणी उष्टे करणार नाही ना? कावळ्याने नाही म्हणून मान हालविली. आता कावळा रोज त्या हौदातील पाणी पिऊ लागला व आनंदानं राहू लागला.
आपल्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टी काढून जीवनाचे नंदनवन बनवणे अगदी सोप....
अधिक वाचा