By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 12:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पुरातण लोककथेनुसार एक राजाच्या मुलीच्या मनात वैराग्याची भावना होती. राजकुमारी विवाह योग्य झाल्यानंतर राजाला तिच्या विवाहासाठी योग्य वर मिळत नव्हता. राजाने मुलीच्या भावनांना समजून घेत खूप विचार करून तिचा विवाह एका गरीब संन्यासासोबत केला.
राजाने विचार केला की, एक संन्यासीच राजकुमारीच्या भावनांची कदर करू शकतो. विवाहनंतर राजकुमारी आनंदाने संन्याशाच्या झोपडीत राहू लागली. झोपडीत स्वच्छता करत असताना राजकुमारीला एका भांड्यात दोन शिळ्या भाकऱ्या सापडल्या. तिने आपल्या पतीला विचारले की, या भाकऱ्या तुम्ही येथे का ठेवल्या आहेत?
संन्यासी उत्तर देत म्हणाला की, या भाकऱ्या मी उद्यासाठी राखून ठेवल्या आहेत. उद्या जर खायला काही मिळाले नाही तर एक-एक भाकरी खाता येईल.
संन्यसाचे उत्तर ऐकून राजकुमारीला हसू आले. राजकुमारी म्हणाली की, 'माझ्या वडिलांनी माझा विवाह तुमच्यासोबत यामुळे करून दिला की, त्यांना असे वाटते की तुम्ही पण माझ्याप्रमाणे वैरागी आहात. तुम्ही सुद्धा फक्त भक्ती करतात आणि उद्याची चिंता करत नाहीत. पण तुम्हाला तर उद्याच्या जेवणाची चिंता सतावते आहे. खरा भक्त तोच असतो जो उद्याची काळजी करत नाही आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवतो. उद्याच्या दिवसाची चिंता तर प्राणी सुद्धा करत नाहीत, आपण तर मानव आहोत. देवाच्या मनात असेल तर आपल्याला जेवण मिळेल आणि जर नाहीच मिळाले तर रात्रभर आनंदाने प्रार्थना करू'
राजकुमारी ही गोष्ट ऐकून संन्यासाचे डोळे उघडले. त्याची पत्नीच खरी संन्यासी असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो राजकुमारीला म्हणाला, 'तुम्ही तर राचकुमारी आहात. राजमहल सोडून माझ्या या लहान झोपडीत आलात, मी तर अगोदरपासूनच एक फकीर आहे. पण तरीही मला उद्याची चिंता सतावत होती. फक्त म्हणल्यामुळे कोणी संन्यासी होत नसते, संन्यास जीवनात उतरावा लागतो. तुम्ही मला वैराग्याचे महत्व समजून सांगितले आहे.'।
बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी निगडीत अनेक प्रसंग आहे. ....
अधिक वाचा