ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संघटितपणाचे महत्त्व

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 07:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संघटितपणाचे महत्त्व

शहर : मुंबई

एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आ¸ष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्‌-कदा चालणार्या भांडणामुंळे तो दुःखी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घड्यावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्राणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.

वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता आली नाही. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, 'बघितलंत ना? एकीचे बळ किती असते ते?' वडील एवढेच बोलले तवर ते सुज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने ते वागूलागले.

 

कथेची शिकवण : एकीचे बळ मोठे असते. भावाभावांनी एकोप्याने राहिलस त्यांचे सामर्थ्य वाढते.

मागे

नकारात्मक विचार करू नका!
नकारात्मक विचार करू नका!

एकदा एक व्यक्ती, दोरीने बांधलेला हत्ती घेऊन जात होता. दुसरा माणूस ते पाहत हो....

अधिक वाचा

पुढे  

पिकलेल प्रेम
पिकलेल प्रेम

कधीही सगळयानसमोर आजीचा हाथ हाथात न घेतलेले आजोबा ,आजीच्या हाथदुखीच आयुर्वे....

Read more