ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 12:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे

शहर : मुंबई

एका गावात एक विद्वान संत राहत होते. लोक त्यांच्याकडे आपल्या अडचणी घेऊन जायचे त्यांना संताकडून समाधान मिळायचे. एक दिवस एक शेठजी त्या संताकडे आले आणि म्हणाले माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत कशाची काही कमी नाही तरीपण माझे मन शांत नाही. मला समाधान मिळत नाही सांगा मी काय करू ..?

हे ऐकून संत जागेवरून उठले आणि आश्रमाकडे निघाले. शेठजीही त्यांच्या मागे मागे आले. आश्रमाच्या एका मोकळ्या कोपऱ्यात त्यांनी आग पेटवली आणि त्या आगीत ते हळु हळू एक एक काडी टाकत होते. टाकलेल्या प्रत्येक काडीसोबत आग कमी जास्त होत होती. काही वेळाने संत परत आपल्या जागेवर येऊन बसले. खुप वेळ झाला तरी संत काहीच बोलले नाही म्हणून शेठजीने विचारले, गुरूजी मी आपल्या उत्तराची वाट पाहतोय. त्यावर संत हसुन म्हणाले एवढा वेळ मी तुझ्याच प्रश्नाचे उत्तर देत होतो पण अस वाटत की तुला ते कळलं नाही,मी तुला समजावुन सांगतो.

संत म्हणाले प्रत्येक माणसात एक आग असते. जर तुम्ही त्यात काम,क्रोध,लोभ,मोह आणि मधाच्या काड्या टाकल्या तर जीवनात कधीच समाधान मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही या तत्वांना आगीत टाकायचे बंद करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. संताचे बोलने ऐकुन शेठजी आपल्या समस्येचे समाधान मिळाले.

कथेची शिकवण - प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात समाधान पाहीजे पण यासाठी तो काहीच करत नाही. जीवनात शांतीसाठी मनावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुमच्या मनात काम,क्रोध, लोभ अशा भावना आहेत तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही. मन संतुष्ट झाल्यावरच समाधान शक्य आहे.

मागे

कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते
कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते

लोककथेनुसार, एका राज्यात एक तरुण व्यक्ती राजा बनला. त्याने मंत्र्यांना आदे....

अधिक वाचा

पुढे  

पंख नाहीत मला पण…..
पंख नाहीत मला पण…..

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भ....

Read more