By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याशी निगडित अनेक प्रेरक प्रसंग प्रसिद्ध आहेत. एका प्रसंगानुसार ते आपल्या शिष्यांना उपदेश देत होते. त्यावेळी विवेकानंददेखील तेथे उपस्थित होते. परमहंसजी शिष्यांना योग्य संधीचे महत्व सांगत होते. गुरुदेव म्हणाले की, व्यक्तीच्या जीवनात अनेकदा संधी येतात, पण ज्ञान आणि हिंमतीची कमी असल्यामुळे आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. अज्ञानामुळे व्यक्तीला संधी आलेली काळात नाही. आणि काहींना संधी आलेली कळते पण त्याचा लाभ घेण्याची हिंमत त्यांच्याकडे नसते. > सर्व शिष्य आपल्या गुरुचे हे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत होते. पण कुणाला काही काळात नव्हते. ही गोष्ट परमहंसजी यांना समजली. त्यांनी समोर बसलेल्या विवेकानंद यांना विचारले नरेंद्र, समज तू एक माशी आहेस आणि तुझ्यासमोर अमृताची वाटी भरलेली आहे. आता तू त्यात उडी मारशील की, किनाऱ्यावरच बसून अमृत प्राशन करशील. > विवेकानंद म्हणाले की, मी किनाऱ्यावरच बसून अमृत प्राशन करेन. कारण मी त्यात उडी मारली तर माझे प्राण संकटात येतील. त्यामुळे समजदारी यातच आहे की, मी किनार्यावर्व्ह बसून अमृत ग्रहण करावे. > सर्व शिष्य विवेकानंद यांच्या या उत्तराने संतुष्ट झाले आणि त्यांचे कौतुक करू लागले. तेव्हा परमहंसजी हसले आणि म्हणाले, मूर्ख जे अमृत पिऊन तू अमर होशील, त्यातच बुडायला घाबरतो. जेव्हा अमृतामध्ये बुडण्याची संधी मिळते आहे तेव्हा मृत्युची भीती कशाला ? अमृत पिल्यानंतर तर तसेही सर्वजण अमर होऊन जातात. तेव्हा सर्व शिष्यांना गुरुचे बोलणे कळाले.
कथेची शिकवण... या कथेची शिकवण ही आहे की, जे आपण आध्यात्मिक क्षेत्रात किंवा भौतिक क्षेत्रात यश हवे असेल तर आपल्याला त्या कामाप्रती पूर्ण समर्पण द्यावे लागते. योग्य संधी ओळखून ती घेण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत आपण एका कामात पूर्णपणे समर्पित होत नाही, आवश्यक ज्ञान आणि हिंमत मिळवत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही.
एका जुन्या लोककथेनुसार कोण्या एका गावातील एका घरात पती-पत्नी राहायचे. ते दो....
अधिक वाचा