By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोककथेनूसार पुरातन काळात एका राजाच्या महानगरीत एक संत आले. जेव्हा राजाची संतासोबत भेट झाली तेव्हा राजा खुप प्रभावित झाला. संताचे ज्ञान धर्म आणि लोकांच्या सुख दुःखाशी निगडित होते. यामुळे राजाने त्यांना आपल्या सोबत ठेवले. राजमहालात त्यांना एक शाही कक्ष देऊन सर्व सुखसोयी दिल्या. राज्याच्या बऱ्याच कामात राजा संतांचा सल्ला घेत असे.
एक दिवस राजा आणि संत दोघेही जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले. घनदाट जंगल असल्यामुळे दोघेही घराची वाट चुकले. खुप भटकंती केल्यानंतरही त्यांना रस्ता सापडत नव्हता. भुकेने दोघे खूप व्याकुळ झाले होते. तितक्यात राजाला एक फळ दिसले. त्याने फळ तोडले आणि फळाचे सहा तुकडे केले. राजाने पहिला तुकडा गुरूंना खायला दिला. पहिला तुकडा खाल्यावर संत म्हणाले हे फळ तर फारच स्वादिष्ट आहे मला आणखी द्या. एकपाठोपाठ एक गुरूजींनी राजा जवळचे पाच तुकडे खाल्ले .
यावर राजाला प्रचंड राग आला आणि तो संतांना म्हणाला की मी सुद्धा उपाशी आहे आणि तुम्ही एकटेच सर्व फळ खात आहात असे म्हणून राजाने तो शेवटचा तुकडा खाल्ला. जसे राजाने ते फळ खाल्ले त्याने ते फळ थुंकले, कारण ते खुप कडू होते. राजाने संतांना विचारले की तुम्ही एवढे कडवट फळ कसे खाऊ शकता. त्यावर संत राजाला म्हणाले की, राजन आपण मला नेहमी गोड फळ खाऊ घातले आहे. केवळ एकदा कडवट फळ दिल्यावर मी तक्रार कसा करू शकतो. मी पुर्ण फळ खाणार होतो, म्हणजे तुम्हाला कडवे फळ खावे लागणार नाही.
कथेची शिकवण या छोट्याशा कथेची शिकवन एवढीच की, जिथे प्रेम आणि मैत्रीचे नाते असते त्यावर कधीच शंका घेऊ नका. कारण शंकेचे नाते कधीच टिकत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याशी निगडित अनेक प्रेरक ....
अधिक वाचा