By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 09:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एका पौराणिक कथेनुसार, एक शांती नावाची महिला होती, पण ती अत्यंत रागीट स्वभावाची होती. जेव्हा तिला राग येत असे तेव्हा ती कोणालाही वाटेल ते बोलायची, मग समोर लहान व्यक्ती असो किंवा मोठा. शांतीच्या या विचित्र वागण्यामुळे कुटुंब आणि गावातील लोक खूप त्रासले होते. पण जेव्हा राग शांत व्हायचा तेव्हा शांतीला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होत असे. त्यामुळे आपला राग नियंत्रणात आणण्यासाठी ती नगरातील एका विद्वान साधूकडे गेली. आणि संताला म्हणाली, गुरूजी माझ्या क्रोधामुळे सर्वांना मी नकोशी झाली आहे. मला यामध्ये काहीच बदल करता येत नाही. आता तुम्ही एखादा असा उपाय सांगा ज्यामुळे माझा राग शांत होईल.शांतीची चिंता बघून साधूंनी तिला एक औषधाची छोटी बाटली देऊन म्हणाले की, हे औषध पिल्याने तुझा राग नियंत्रणात येईल. त्यामुळे जेव्हा तुला राग येईल तेव्हा हे औषध घे आणि जोपर्यंत तुझा राग शांत होत नाही तोर्यंत पीत रहा. एका आठवड्यातच तुझी ही सवय संपूर्णपणे बरी होईल. शांती गुरूजींचा सल्ला आणि औषध घेऊन घरी आली.
आता जेव्हा शांतीला राग येत असे ती लगेच ते औषध घेऊन शांत बसत असते. संतानी दिलेल्या औषधाचा एका आठवड्यातच प्रभाव पडला आणि तिचा राग आता कमी होऊ लागला होता. त्यामुळे शांतीला खूप आनंद झाला आणि संताला भेटण्यासाठी आली.शांतीने येताच संताना प्रणाम केला आणि म्हणाली, गुरूजी आपण दिलेल्या औषधाच्या चमत्कारामुळे माझा राग कमी झाला आहे. मला तुम्ही या औषधाचं नाव सांगा.यावर संताने हसून उत्तर दिले, ते म्हणाले की, त्या बाटलीमध्ये कोणतेही औषध नसून फक्त साधे पाणी होते. राग आल्यावर तुझी वाचा बंद ठेवणे आवश्यक होते, त्यासाठी मी तुला ही बाटली दिली होती. कारण जेव्हा औषधाची बाटली तुझ्या तोंडामध्ये असायची तेव्हा तू समोरच्या काहीच उत्तर देऊ शकत नव्हती. आणि समोरचा व्यक्तीही प्रत्युत्तर देत नसे. म्हणेज जेव्हा आपण क्रोधाचे उत्तर मौन राहून देतो तेव्हा ती बाब तिथेच संपुष्टात येते.
कथेची शिकवण
आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन. रागा आल्यावर मौन पाळल्याने आपण वाईट बोलणे टाळतो. त्यामुळे आपण अशा परिस्थितीत शांत राहिले पाहिजे. त्यासाठी दररोज थोडा वेळ ध्यान करणे आवश्यक आहे.
एका लोककथेनुसार पुरातन काळा एका शेतकऱ्याच्या शेतात एक दगड फसलेला होता. त्य....
अधिक वाचा