ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला

शहर : मुंबई

एका कॉलेजमध्ये फिलॉसफीचे एक प्रोफेसर शिकवायचे. ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे. एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खुप महत्त्वपुर्ण गोष्ट समजावणार आहे. सर्व विद्यार्थी लक्षपुर्वक प्रोफेसरचे बोलणे ऐकत होते. प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकले. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागले. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जे बेडूक होते ते पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होते. हळुहळू पाणी जास्त गरम होत पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता. काही वेळानंतर पाण्याचे तापमान वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीही सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

बेडकाने पुर्ण शक्ती लावूनही त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले आणि विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी का मारु शकले नाही? सर्वांनी वेगवेगळे उत्तर दिले.

तेव्हा प्रोफेसर म्हणाले, बेडूकाची इच्छा असती तर तो मी पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होता, जेवढे तो सहन करू शकत होता तेवढे त्याने केले. पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण त्याने अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेले असते.

कथेची शिकवण-

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी मिळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. पण जेव्हा आपण पुर्णपणे परिस्थितींमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होतो. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. या कथेमधील बोध म्हणजे, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.

मागे

जीवन सार्थक आणि यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्णाच्या जीवनातील  ही सूत्रे दिशादर्शक आहेत.
जीवन सार्थक आणि यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्णाच्या जीवनातील ही सूत्रे दिशादर्शक आहेत.

मनुष्य जीवन दुर्लभ आहे. देवतांनाही मनुष्य जन्म घेण्यासाठी प्रतिक्षा करावी ....

अधिक वाचा

पुढे  

जो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो……..
जो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो……..

सर्वांच्या आयुष्यात मित्राचे महत्त्व जास्त असते. हे एक असे नाते असते ज्याच....

Read more