By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2019 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अडचणी तर प्रत्येकाच्या जीवनात असतात. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्गही उपलब्ध असतात. काही लोक योग्य वेळी योग्य मार्ग निवडतात आणि यशाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो. काही लोक मात्र सर्व काही नशिबाच्या हवाली सोडून आळसात जीवन कंठतात आणि जीवनभर दु:खाला कवटाळून बसतात.
एक सामान्य बालक चंद्रगुप्त याला अखंड भारताचा सम्राट बनविणा-या कौटिल्याच्या जीवनातील एक महत्त्वाचे सूत्र येथे देत आहोत. हे सूत्र आपण अवलंबिले तर आपल्या जीवनाचे सोने होईल. आर्य चाणक्य म्हणतात, नियती तर आपले फासे टाकत असते आणि या खेळाच्या प्रभावाने आपल्याला कधी दु:ख मिळते तर कधी सुख.
दुखात असताना सदैव एक गोष्ट ध्यानात ठेवले पाहिजे की नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत. इतिहासात ठसाही उमटवत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्ग निवडण्यातच शहाणपण आहे. निवडलेल्या रस्त्यावरून वेळ न दवडता पुढे निघून जा.
आर्य चाणक्य यांनी सांगितलेले हे सूत्र जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रभावी आणि अडचणींतून दिलासा देणारे आहे. जो माणूस नियतीचे संकेत समजून घेऊन जीवनात उतरवितो तो इतिहास घडवितो. जीवनात यशस्वी होण्यासाठीचा हा अचूक मार्ग आहे.
कधीही सगळयानसमोर आजीचा हाथ हाथात न घेतलेले आजोबा ,आजीच्या हाथदुखीच आयुर्वे....
अधिक वाचा