ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अडचणी दूर होण्याची वाट पाहात बसल्यास यश कधीही मिळणार नाही

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अडचणी दूर होण्याची वाट पाहात बसल्यास यश कधीही मिळणार नाही

शहर : मुंबई

एका गावातील व्यक्ती दिवसभर शेतात काम करून कसेबसे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता. त्या व्यक्तीला नेहमी वाटायचे की आपले आयुष्य किती कष्टदायक आहे. एका समस्येचे निवारण होत नाही तर लगेच दुसरी समस्या समोर उभी असते. संपूर्ण आयुष्य या समस्या दूर करण्यातच निघून जात आहे.

एके दिवशी व्यक्ती एका साधूकडे गेला आणि आपली समस्या सांगितली. आयुष्यातील अडचणींचा कसा सामना करू असा प्रश्न विचारला? बोलणे ऐकून साधू पहिले हसले आणि म्हणाले- तू माझ्यासोबत चल, तुला तुझ्या समस्येचे समाधान सांगतो. तो व्यक्ती त्यांच्यासोबत चालत-चालत नदीच्या काठावर आला.

नदीच्या काठावर आल्यानंतर साधू म्हणाले, आपण नदीच्या दुसऱ्या बाजूला पोहोचल्यानंतर मी तुला तुझ्या समस्येचे समाधान सांगेल. नदीच्या काठावर दोघेही खूप वेळ उभे होते, ता व्यक्तीने विचारले महाराज आपल्याला नदीच्या पलीकडे जायचे आहे आणि आपण अजून इथेच का उभे आहोत?

साधूंनी उत्तर दिले- नदीचे पाणी आटून गेल्यानंतर आपण आरामात नदी पार करून जाऊ. साधूचे उत्तर ऐकून आश्चर्य वाटले, तो म्हणाला नदीचे पाणी कसे काय आटू शकते? त्याचे म्हणणे ऐकून साधू हसले आणि म्हणाले हेच तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. आयुष्य एक नदी आहे आणि समस्या पाण्याप्रमाणे आहेत.

जर तुला हे माहिती आहे की नदीचे पाणी आटणार नाही मग तुलाच प्रयत्न करून नदी पार करावी लागेल. त्याचप्रमाणे जीवनात समस्या येतच राहणार आणि प्रामाणिक प्रयत्न करून त्यावर मार्ग काढावा लागेल. काठावर बसून नदीचे पाणी वाटण्याची वाट पाहत बसलास तर आयुष्यभर काहीच करू शकणार नाहीस.

लाईफ मॅनेजमेंट - आपल्यालाही फक्त आपल्याच आयुष्यात सर्व अडचणी आहेत असे वाटत राहते. या जगात कदाचितच एखादा असा व्यक्ती असेल ज्याला अडचणी, समस्या नसतील. प्रत्येकाला काही काही समस्या आहेच परंतु त्या समस्येवर मार्ग काढून पुढे चालणारच सुखी जीवन जगू शकतो.

 

मागे

थोडीशी युक्ती वापरली तर सर्व समस्येचे समाधान होऊ शकते
थोडीशी युक्ती वापरली तर सर्व समस्येचे समाधान होऊ शकते

एका गावामध्ये एक शेतकरी शेतामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करत ....

अधिक वाचा

पुढे  

सुख आणि दुखः फक्त आपल्या सवयी आहेत, दुखी राहण्याची सवय आपण आत्मसात केली आहे
सुख आणि दुखः फक्त आपल्या सवयी आहेत, दुखी राहण्याची सवय आपण आत्मसात केली आहे

एका जुन्या लोककथेनुसार कोण्या एका गावातील एका घरात पती-पत्नी राहायचे. ते दो....

Read more